पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय शास्त्रीय नृत्यांगना डॉ यामिनी कृष्णमूर्ती यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
डॉ कृष्णमूर्ती यांनी भारतीय वारसा समृद्ध करण्याचे मोठे कार्य केले आहे असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर म्हटले आहे :
"डॉ. यामिनी कृष्णमूर्ती यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारात त्यांनी गाजवलेले श्रेष्ठत्व आणि समर्पण यामुळे अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली आहे आणि आपल्या सांस्कृतिक पटलावर त्यांनी अमिट छाप सोडली आहे. त्यांनी आपला वारसा समृद्ध करण्यासाठी मोठे काम केले आहे. त्यांच्या कुटुंबियांचे आणि चाहत्यांचे सांत्वन करतो. ओम शांती."
Pained by the passing away of Dr. Yamini Krishnamurthy. Her excellence and dedication to Indian classical dance have inspired generations and left an indelible mark on our cultural landscape. She has worked greatly to enrich our heritage. Condolences to her family and admirers.…
— Narendra Modi (@narendramodi) August 4, 2024