पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील वाकायामा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान घडलेल्या हिंसक घटनेचा निषेध केला आहे , या कार्यक्रमाला जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा उपस्थित होते.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"जपानमधील वाकायामा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान घडलेल्या हिंसक घटनेबद्दल समजले जिथे माझे मित्र पंतप्रधान @Kishida230 उपस्थित होते. ते सुखरूप आहेत हे ऐकून बरे वाटले . त्यांच्या निरामय आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना. सर्व प्रकारच्या हिंसेचा भारत निषेध करतो."
Learnt of a violent incident at a public event at Wakayama in Japan where my friend PM @Kishida230 was present. Relieved that he is safe. Praying for his continued well-being and good health. India condemns all acts of violence.
— Narendra Modi (@narendramodi) April 15, 2023