Quoteश्री अरविंदो यांच्या ‘क्रांती’ आणि ‘उत्क्रांती’च्या तत्वज्ञानावर या उत्सवात भर द्यायला हवा: पंतप्रधान
Quoteनर ते नारायण या तत्वात अंतर्भूत असलेल्या महानतेच्या संकल्पनेप्रती तरुणांना प्रोत्साहित केले पाहिजे : पंतप्रधान
Quoteविश्वाचा अध्यात्मिक नेता म्हणून जगभरातील देशांसाठी अध्यात्मवादाच्या बाबतीत योगदान देणे ही भारताची जबाबदारी आहे : पंतप्रधान

श्री अरविंदो यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त होणारा महोत्सव योग्य पद्धतीने आयोजित व्हावा यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या आज झालेल्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषविले. या समितीची अधिसूचना 20 डिसेंबर 2021 रोजी जारी करण्यात आली होती. या समितीमध्ये जीवनाच्या विविध क्षेत्रांतील 53 सदस्यांचा समावेश आहे.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी हा महोत्सव साजरा करण्याच्या आराखड्याचे सादरीकरण केले आणि  श्री अरविंदो यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त होणारा महोत्सव योग्य पद्धतीने आयोजित करण्यासाठी समितीच्या माननीय सदस्यांनी आपल्या सूचना दिल्या. या प्रसंगी बोलताना समितीच्या सन्माननीय सदस्यांनी श्री अरविंदो यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या महोत्सवाबद्दल त्यांचे मौल्यवान विचार आणि सूचना मांडल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. श्री अरविंदो  यांच्या तत्वज्ञानातील ‘क्रांती’ आणि ‘उत्क्रांती’च्या दोन पैलूंचे अत्यंत महत्त्व आहे आणि हा उत्सव साजरा करताना त्यावर भर द्यायला हवा असे ते म्हणाले. श्री अरविंदो  यांनी मांडलेल्या सिद्धांताप्रमाणे, महामानवाची निर्मिती करण्यासाठी नर ते नारायण या तत्वात अंतर्भूत असलेल्या महानतेच्या संकल्पनेप्रती तरुणांना प्रोत्साहित केले पाहिजे असे त्यांनी पुढे सांगितले.

अध्यात्मिक विषयांवर विश्वाचे नेतृत्व करणाऱ्या भारताने, जगभरातील देशांसाठी अध्यात्मवादाच्या बाबतीत योगदान देणे ही आपलीजबाबदारी आहे, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले. देशभरातील दीडशे विद्यापीठांनी श्री अरविंदो  यांच्या जीवनाच्या विविध पैलूंची माहिती देणारे लेख लिहिण्याचे काम हाती घेतले पाहिजे आणि असे दीडशे लेख या प्रसंगी प्रसिध्द केले पाहिजेत अशी सूचना त्यांनी केली..

|

श्री अरविंदो  यांच्या स्मरणार्थ होणारा उत्सव, राष्ट्रीय युवक दिनी पुदुचेरी येथून सुरु करावा असा प्रस्ताव पंतप्रधानांनी मांडला.यामुळे, युवकांना श्री अरविंदो  यांनी 1910 ते 1950 हा कालावधी जेथे व्यतीत केला त्या  पुदुचेरी गावाला भेट देऊन अरविंदो  यांचे जीवन आणि शिकवण याविषयी माहिती मिळविण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी यावेळी, ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना, श्री अरविंदो  यांचे शिष्य किरीट जोशी यांच्याशी झालेली चर्चा आणि विचारविनिमय यांची अत्यंत सुखद आठवण सांगितली. ते म्हणाले की या भेटीमुळे श्री अरविंदो  यांच्या विचारांनी मला समृध्द केले आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्याचे काम करताना हे विचार सखोलतेने त्यात प्रतिबिंबित झाले. किरीट जोशी यांचे  श्री अरविंदो  यांच्याविषयीचे साहित्य जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले पाहिजे अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.  

|

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या बैठकीत सहभागी झालेल्या सदस्यांनी अमूल्य सूचना केल्याबद्दल आणि त्यासाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानून बैठकीचा सामोरोप केला.

उच्चस्तरीय समितीची आजची बैठक मिश्र पद्धतीने घेण्यात आली. 16 सन्माननीय सदस्य प्रत्यक्ष उपस्थित होते तर 22 सदस्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीत भाग घेतला. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले. सदस्यांनी या बैठकीत मौलिक सूचना केल्या.श्री अरविंदो  यांच्या एकात्मिक शिक्षण संकल्पनेचा अंतर्भाव नव्या शैक्षणिक धोरणात केला जावा आणि महाविद्यालये तसेच विद्यापीठ पातळीवरील अभ्यासक्रमांमध्ये त्याचा समावेश असावा असे मत सर्व सदस्यांनी व्यक्त केले. 

 

  • शिवकुमार गुप्ता January 14, 2022

    🙏🌷जय श्री सीताराम जी🌷🙏
  • SanJesH MeHtA January 11, 2022

    यदि आप भारतीय जनता पार्टी के समर्थक हैं और राष्ट्रवादी हैं व अपने संगठन को स्तम्भित करने में अपना भी अंशदान देना चाहते हैं और चाहते हैं कि हमारा देश यशश्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में आगे बढ़ता रहे तो आप भी #HamaraAppNaMoApp के माध्यम से #MicroDonation करें। आप इस माइक्रो डोनेशन के माध्यम से जंहा अपनी समर्पण निधि संगठन को देंगे वहीं,राष्ट्र की एकता और अखंडता को बनाये रखने हेतु भी सहयोग करेंगे। आप डोनेशन कैसे करें,इसके बारे में अच्छे से स्मझह सकते हैं। https://twitter.com/imVINAYAKTIWARI/status/1479906368832212993?t=TJ6vyOrtmDvK3dYPqqWjnw&s=19
  • Moiken D Modi January 09, 2022

    best PM Modiji💜💜💜💜 want to see you legend of my life💚💚💚💚 for real life
  • Raj kumar Das January 03, 2022

    नमो नमो🙏🌷
  • Chowkidar Margang Tapo January 01, 2022

    namo namo namo namo again 24....
  • G.shankar Srivastav January 01, 2022

    सोच ईमानदार काम दमदार फिर से एक बार योगी सरकार
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Global aerospace firms turn to India amid Western supply chain crisis

Media Coverage

Global aerospace firms turn to India amid Western supply chain crisis
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Former UK PM, Mr. Rishi Sunak and his family meets Prime Minister, Shri Narendra Modi
February 18, 2025

Former UK PM, Mr. Rishi Sunak and his family meets Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

Both dignitaries had a wonderful conversation on many subjects.

Shri Modi said that Mr. Sunak is a great friend of India and is passionate about even stronger India-UK ties.

The Prime Minister posted on X;

“It was a delight to meet former UK PM, Mr. Rishi Sunak and his family! We had a wonderful conversation on many subjects.

Mr. Sunak is a great friend of India and is passionate about even stronger India-UK ties.

@RishiSunak @SmtSudhaMurty”