पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्ष 2020 मधील पहिली प्रगती बैठक झाली. प्रगती म्हणजेच कार्यक्षम प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणीसाठी आयसीटी आधारित बहुस्तरीय व्यासपीठ या बैठकीचे हे 32 वे सत्र होते. यात केंद्र आणि राज्य सरकार यांचा समावेश असतो.
आजच्या प्रगती बैठकीत पंतप्रधानांनी 11 प्रकल्पांविषयी चर्चा केली त्यापैकी 9 प्रकल्प निश्चित वेळेपेक्षा विलंबाने सुरू आहेत. यात ओडिशा, तेलंगणा, महाराष्ट्र, झारखंड, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, उत्तर प्रदेश या राज्यातले तर तीन केंद्रीय मंत्रालयांचे प्रकल्प आहेत. यात रेल्वे मंत्रालयांचे तीन, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे पाच आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचा एक प्रकल्प आहे.
पीएमजेजेबीवाय आणि पीएमएसबीवाय योजनांच्या प्रगतीचा आढावा
या बैठकीत प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना या दोन विमा योजनांशी संबंधित तक्रारींचा आढावा घेण्यात आला.
सीसीटीएनएस या गुन्हेगारी आणि गुन्हेगार शोध जाळे आणि यंत्रणा या प्रकल्पाचाही आढावा पंतप्रधानांनी घेतला. ई प्रशासनाच्या माध्यमातून ही सर्वसमावेशक आणि एकात्मिक तपास व्यवस्था विकसित करण्यात आली आहे.
आधीच्या 31 प्रगती बैठकीत पंतप्रधानांनी एकूण 269 प्रकल्पांचा आढावा घेतला आहे. 12.30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पांमध्ये अपेक्षित आहे. त्याशिवाय सरकार 47 योजना आणि कार्यक्रमांशी संबंधित तक्रारींचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.