पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुजरातमधील गांधीनगर येथे श्री सोमनाथ ट्रस्टची बैठक झाली. यावेळी ट्रस्टच्या कामकाजाशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली.
मंदिर संकुलामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा कसा घेता येवू शकतो याचा आढावाही त्यांनी घेतला. अशा सुविधांमुळे मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने यात्रेचा अनुभव अधिक संस्मरणीय होईल.
‘एक्स’ समाज माध्यमावर पंतप्रधान म्हटले आहे की;
"गांधीनगर येथे श्री सोमनाथ ट्रस्टच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. आम्ही ट्रस्टच्या कामकाजाशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा केली. आम्ही मंदिर संकुलासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा फायदा घेऊ शकतो याचा आढावा घेतला. जेणेकरून तीर्थयात्रेचा अनुभव आणखी संस्मरणीय होईल. तसेच ट्रस्टकडून करण्यात येत असलेल्या विविध पर्यावरणपूरक उपाययोजनांचा आढावा घेतला."
Chaired a meeting of the Shree Somnath Trust in Gandhinagar. We discussed various aspects relating to the working of the Trust. Reviewed how we can leverage latest technology for the Temple complex so that the pilgrimage experience will be even more memorable. Also took stock of… pic.twitter.com/A21iyVg1qo
— Narendra Modi (@narendramodi) October 30, 2023