पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑक्सिजन वाढीच्या प्रगतीचा आणि देशभरातील उपलब्धतेचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना देशभरात पीएसए ऑक्सिजन संयंत्र बसविण्याच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. देशभरात 1,500 हून अधिक पीएसए ऑक्सिजन सयंत्र बसवण्यात येणार असून त्यात पीएम केअर्स तसेच विविध मंत्रालये व सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांचे योगदान आहे.
देशातील सर्व राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये पीएमए केअर्स द्वारा योगदानाअंतर्गत दिले जाणारे पीएसए ऑक्सिजन सयंत्र उपलब्ध होणार आहेत. पंतप्रधानांना सांगितले गेले की एकदा पंतप्रधान केअर्स द्वारा उभारले जाणारे सर्व पीएसए ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर ते 4 लाखाहून अधिक ऑक्सिजनयुक्त खाटांना साहाय्य करतील.
ही सयंत्रे लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी व त्यासाठी राज्य सरकारबरोबर काम करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ऑक्सिजन सयंत्राना त्वरित कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत नियमित संपर्कात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली.
ऑक्सिजन संयंत्राचे कार्यान्वयन आणि देखभाल करणाऱ्या रुग्णालय कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण सुनिश्चित करण्याचे पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध आहेत हे सुनिश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.या क्षेत्रातील तज्ञांनी तयार केलेले एक प्रशिक्षण मॉड्यूल आहे आणि ते देशभरातील सुमारे 8,000 लोकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पंतप्रधान म्हणाले की, स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर या ऑक्सिजन संयंत्राची कामगिरी आणि कामकाजाचा मागोवा घेण्यासाठी आपण आयओटीसारखे प्रगत तंत्रज्ञान तैनात केले पाहिजे. ऑक्सिजन प्रकल्पाच्या कामगिरीवर नजर ठेवण्यासाठी आयओटी अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्ज चा वापर करून प्राथमिक तत्वावर प्रकल्प चालविला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली.
या बैठकीला पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव, गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.
Reviewed oxygen augmentation progress across the nation. Was briefed on installation of PSA Oxygen plants and using technology to track their performance. https://t.co/Z1NBGdKnLQ
— Narendra Modi (@narendramodi) July 9, 2021