Quoteवादळाचा प्रभाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांना दिली माहिती
Quoteअसुरक्षित ठिकाणच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याची सुनिश्चिती करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा :पंतप्रधान
Quoteसर्व अत्यावश्यक सेवांच्या देखभालीची सुनिश्चिती करुन वादळात या सेवांचे नुकसान झाल्यास त्या त्वरित पूर्ववत करण्यासाठी सज्ज राहा :पंतप्रधान
Quoteवादळामुळे प्रभावित होऊ शकणाऱ्या भागातील प्राण्यांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करण्याचे पंतप्रधानांचे अधिकाऱ्यांना निर्देश

देशातील समुद्रकिनारी धडकण्याची भीती असलेल्या ‘बिपरजॉय’ वादळामुळे उद्‌भवू शकणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र तसेच गुजरात राज्य सरकारची मंत्रालये तसेच सरकारी संस्थांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.

असुरक्षित ठिकाणच्या रहिवाशांना राज्य सरकारतर्फे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येईल,  याची सुनिश्चिती करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. तसेच त्या भागातील  वीजपुरवठा, दूरसंचार सेवा,आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यांसारख्या सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील आणि वादळामुळे त्यांचे नुकसान झाल्यास त्या त्वरित पूर्ववत करण्यात येतील याची देखील सुनिश्चिती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.  वादळामुळे प्रभावित होऊ शकणाऱ्या भागातील प्राण्यांची देखील सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंतप्रधानांनी या भागातील यंत्रणांचे नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत ठेवण्यास सांगितले आहे.

येत्या 15 जून च्या दुपारपर्यंत हे वादळ  मांडवी (गुजरात) आणि कराची(पाकिस्तान)च्या मधून जाखू बंदराजवळ सौराष्ट्र आणि कच्छ ओलांडेल अशी माहिती  या बैठकीमध्ये उपस्थित भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.यावेळी या वादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी 125 ते 135 किलोमीटर असेल आणि हा वेग ताशी 145 किलोमीटरपर्यंत वाढू शकेल असे त्यांनी सांगितले.

या वादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाउस पडेल तसेच कच्छ,देवभूमी द्वारका आणि जामनगर या परिसरात अत्यंत मुसळधार स्वरूपाचा पाउस पडेल तर पोरबंदर,राजकोट,मोरबी आणि जुनागढ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी 14 आणि 15 जून रोजी अतिवृष्टी होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की 6 जून रोजी वादळाची पूर्वसूचना मिळाल्यापासून विभागातर्फे सर्व संबंधित राज्ये आणि यंत्रणांसाठी नियमितपणे माहितीपत्रके जारी करण्यात येत आहेत.

गृह मंत्रालय चक्रीवादळाशी संबंधित सद्यःस्थितीचा 24*7 (सातत्त्याने) आढावा घेत असून, राज्य सरकार आणि संबंधित केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात आहे, अशी माहिती देण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) आपल्या 12 तुकड्या तैनात केल्या असून, त्या  बोटी, झाडे कापणारी यंत्र, दूरसंचार उपकरणे इत्यादींनी सुसज्ज आहेत तसेच 15 राखीव तुकड्या देखील सज्ज ठेवल्या आहेत.

भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने मदत, शोध आणि बचाव कार्यासाठी जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. नौका आणि बचाव उपकरणांसह भारतीय हवाई दल आणि  लष्कराच्या अभियंता कृती दलाच्या तुकड्याही तैनातीसाठी सज्ज आहेत. पाळत ठेवणारी विमाने आणि हेलिकॉप्टर किनारपट्टी भागावर लक्ष ठेवत आहेत. लष्कर, नौदल आणि तटरक्षक दलाची आपत्ती निवारण पथके (DRTs) आणि वैद्यकीय पथके (MTs) सज्ज आहेत. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी गुजरात सरकारने केलेल्या उपाययोजनांचीही पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री स्तरावरील जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठका घेण्यात आल्या असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संपूर्ण राज्य प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. तसेच, कॅबिनेट सचिव आणि गृह सचिव हे गुजरातचे मुख्य सचिव आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये/संस्था यांच्या सतत संपर्कात आहेत. या बैठकीला गृहमंत्री, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

  • naval kishor June 17, 2023

    जय भाजपा🇮🇳🚩
  • DHARAM PAL June 17, 2023

    namo namo Jai shree Ram
  • Pawan sumbria village bungal June 17, 2023

    BJP zindabad
  • jadavhetaldahyalal June 17, 2023

    *CBI चीफ लखनऊ की एक रिपोर्ट* *लड़कियां विशेष ध्यान दें। क्या आप जानते है।* *बॉडी पार्ट्स आते कहाँ से है???* आपने सुना होगा कि 40 लाख देकर किडनी बदलवा लो। वो भी 16 - 25 आयु के आसपास की मजबूत किडनी.. अब सोचो आखिर ये बॉडीपार्ट्स कहाँ से आते है...? मुर्दाघरो में पड़ी लाशो से या एक्सीडेंट में मरने वालो से...?? एक जगह और है। वो है... भारत में मिडिल क्लास फैमिली की लड़कियां...!!! ये लड़कियां सिगरेट, गुटखा या शराब नही यूज करती। इनके दाँत, हड्डी, आँते, चमडा़, दिल, लीवर, किडनी, सब सही और ट्रांसप्लांट के लिए अच्छे होते है..._ इन लडकियों को *प्यार में फसाकर* या *नौकरी का झांसा* देकर कहीं भी ले जाना आसान होता है... इसलिए सुन्दर स्मार्ट हीरोटाइप लडके इन लड़कियों को जाल में फंसाते हैं... ये लडके वास्तव में *प्रोफेशनल क्रिमिनल* होते हैं,, ये पैसे के लिए कुछ भी कर सकते है। - हर साल *फरवरी के अंत तक मिडिल क्लास फैमिली की 2 से 4 लाख लडकियां घर से गायब* हो जाती हैं... व्यौरा दिया जाता है कि... *आशिकी में घर से भाग गयी..,*ना तो कोई *केस* बनता है, ना कोई *खोजता* है... बाद में उनका कोई पता नहीं चलता ..*जरा सोचिये, *ये लडकिया कहाँ पहुँच जाती है??* अब आप अच्छी तरह समझ सकते हो..., असल में पहले तो *इन बच्चियों का भरपूर शारीरिक शोषण किया जाता है। उसके बाद इनकी हत्या कर दी जाती है और शरीर के अंग बेचकर कमाई की जाती है..* - अभी आप गूगल पर ' *Black market price of human body parts* सर्च करके अंगो के भाव देखिएगा.. फिर *Organ Transplant Rate in India* सर्च करके अंग प्रत्यारोपण का खर्च देखना... अगर एक *लडकी की बॉडी के अंगों की सही कीमत लगे, तो कम से कम 5 करोड़ आराम से* मिल जाता है,,। इसीलिए *लव और मानव तस्करी पर ना तो कभी कोई कानून बनता है, और ना ही कोई बनने देता है...।* - एक बात और **ये घटनाये ज्यादातर उन्हीं लडकिया के साथ होती हैं, जिनके परिवार कमजोर होते है या जिनके कोई राजनितिक या क़ानूनी Approach/पकड़ नही* होती...। -- 2015 में UP से *4000 लडकिया गायब* हुई थी, वही 2017 से 2018 तक 7000 लड़कियां गायब हुई थी। औऱ ये घटनायें अधिकतर लखनऊ, दिल्ली, मुम्बई जैसे बड़े सहरो में अधिक पाई गई है। - माना कि हमारी लाड़ली बहिन बेटियां *सब जानती* हैं, लेकिन *क्रिमिनल मार्केटिंग* और *अंग प्रत्यारोपण* के लिए *सही और असली अंग आते कहाँ से हैं...* ये नही जानती,,, - - अपनी बहिन बेटियों का ध्यान दें, क्योंकि, *जो बाहर हो रहा है, वो हमारे घर में कभी भी हो सकता है...!* औऱ लोगो की सही सलाह ले। किसी के झांसे में न आये। कृपया, पढ़कर अपने संपर्क में सभी को शेयर कीजिये जिससे *किसी की बहन-बेटी इस तरह के षड़यंत्र का शिकार ना हो!* यह षडयंत्र किसी भी तरह से अंजाम दिया जा सकता है वैवाहिक विज्ञापन द्वारा..विवाह प्रस्ताव द्वारा..नौकरी का झांसा देकर.. फ़ेसबुक दोस्ती द्वारा ...अत :हर प्रकार से सतर्कता आवश्यक है परिवार में, घर में, दोस्तों में, *चर्चा करने *बहिन-बेटी की अनमोल जान* बचा सकेगी आइये हम अपना नैतिक दायित्व निभाएं *क्राइम ब्रांच लखनऊ* *उत्तर प्रदेश* प्लीज इस पर गौर करें हम इधर उधर के मैसेज तो रोज ही भेजते रहते हैं यह हमारे देश की बहन बेटियां लड़कियों की इज्जत और उनकी जान का सवाल है कृपया ज्यादा से ज्यादा इस मैसेज को साझा करें धन्यवाद *CBI चीफ लखनऊ* 🤔😱😯...सादर राधे राधे 🙏
  • Vinod Chandra Tiwari June 17, 2023

    जय भारत जय उत्तराखण्ड
  • hari shankar shukla June 17, 2023

    नमो नमो
  • Pritiva Deb June 17, 2023

    Great 🙏🙏🙏
  • Dipu Tarafdar June 17, 2023

    Very good service
  • INDIAN June 17, 2023

    congratulations modiji for handling the cyclone effected areas effectively to minimize the casualties. Thanks for the central and state govt.
  • Beejal Technical June 17, 2023

    hello im from pakistan plz help me
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Global aerospace firms turn to India amid Western supply chain crisis

Media Coverage

Global aerospace firms turn to India amid Western supply chain crisis
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Former UK PM, Mr. Rishi Sunak and his family meets Prime Minister, Shri Narendra Modi
February 18, 2025

Former UK PM, Mr. Rishi Sunak and his family meets Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

Both dignitaries had a wonderful conversation on many subjects.

Shri Modi said that Mr. Sunak is a great friend of India and is passionate about even stronger India-UK ties.

The Prime Minister posted on X;

“It was a delight to meet former UK PM, Mr. Rishi Sunak and his family! We had a wonderful conversation on many subjects.

Mr. Sunak is a great friend of India and is passionate about even stronger India-UK ties.

@RishiSunak @SmtSudhaMurty”