Quoteपंतप्रधानांनी सात राज्यातील सुमारे 31,000 कोटी रुपयांच्या आठ महत्वाच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा
Quote“यूएसओएफ प्रकल्पाअंतर्गत, मोबाईल टॉवर्स आणि 4 जी कव्हरेज”चा आढावा घेतांना, चालू आर्थिक वर्षात, देशात अद्याप टॉवर्स न पोहोचलेल्या सर्व गावांमध्ये मोबाईल टॉवर्स लावण्याची पंतप्रधानांची सूचना
Quoteपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज, प्रगती- या आयसीटी आधारित बहु-आयामी सक्रिय प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी प्लॅटफॉर्म अंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज, प्रगती- या आयसीटी आधारित बहु-आयामी सक्रिय प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी प्लॅटफॉर्म अंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. 

या बैठकीत, एकूण आठ प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यापैकी चार प्रकल्प जल पुरवठा आणि सिंचनाशी संबंधित आहेत. तर दोन प्रकल्प राष्ट्रीय महामार्गांचा विस्तार आणि दळणवळणाशी संबंधित आहेत. तर इतर दोन प्रकल्प, रेल्वे आणि मेट्रो रेल्वे दळणवळणाशी संबंधित आहेत. ह्या आठ प्रकल्पांचा एकूण खर्च 31,000 हजार कोटी रुपये इतका आहे,  हे प्रकल्प महाराष्ट्र, बिहार, झारखंड, हरियाणा, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि गुजरात या राज्यांशी संबंधित आहेत.

उपग्रह प्रतिमांसारख्या तंत्रज्ञानाच्या उपयोग करत, पंतप्रधान गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन पोर्टल प्रकल्पांसाठी स्थान आणि जमिनीच्या आवश्यकतांशी संबंधित अंमलबजावणी आणि नियोजनाच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात मदत होऊ शकेल, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

लोकसंख्येची उच्च घनता असलेल्या शहरी भागात प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या, सर्व हितसंबंधियांनी, नोडल अधिकारी नियुक्त करावे तसेच चांगल्या समन्वयासाठी चमू तयार काराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सिंचन प्रकल्पांची अंमलबजावणी करतांना, जिथे पुनर्वसन आणि पुनर्बांधणीचे काम यशस्वी झाले आहे अशा भागधारकांच्या भेटी आयोजित कराव्यात, असा सल्ला त्यांनी दिला. अशा प्रकल्पांमुळे झालेल्या परिवर्तनाचा प्रभाव देखील दाखवला जाऊ शकतो. यामुळे, प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीसाठी भागधारकांना प्रेरणा मिळेल, असे मोदी म्हणाले.

या आढावा बैठकीत, पंतप्रधानांनी ‘यूएसओएफ प्रकल्पांतर्गत मोबाईल टॉवर्स आणि 4G कव्हरेज’चाही आढावा घेतला. युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (USOF) अंतर्गत, 24,149 मोबाईल टॉवर असलेल्या 33,573 गावात, शंभर टक्के मोबाईल नेटवर्क उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  पंतप्रधानांनी सर्व संबंधितांशी नियमित बैठका घेऊन या आर्थिक वर्षात, ज्या गावात अद्याप नेटवर्क नाही, अशा गावांमध्ये मोबाईल टॉवर उभारण्याचे काम पूर्ण करण्यास सांगितले. या अंतर्गत सर्वात आधी दुर्गम भागातील गावात 100 टक्के मोबाईल कव्हरेज देणे सुनिश्चित केले जाईल.

43 व्या प्रगती बैठकीपर्यंत, एकूण 17.36 लाख कोटी रुपये खर्चाच्या 348 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे.

 

  • Subrata Debnath December 25, 2023

    Jay shree Ram
  • Brijesh Kumar Bharti October 29, 2023

    श्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जी को मैं स्वागत अभिनंदन करता हूं जय जय श्री मै आप को बहुत बहुत धन्यवाद करता हूं आप को स्वागत अभिनंदन करता हूं जय श्री राम
  • Asha Gupta October 29, 2023

    jai bharat
  • Ritesh Gupta October 29, 2023

    8hggjj
  • Babaji Namdeo Palve October 29, 2023

    Jai Hind Jai Bharat Bharat Mata Kee Jai
  • ranu das October 29, 2023

    Joy ho🙏🏻🇨🇮
  • ADARSH PANDEY October 29, 2023

    proud always dad
  • Rupali BhupendraKumar Ner October 29, 2023

    #Tisari_baar_modi_sarkar
  • Suneel Kaur October 29, 2023

    plz don't give the bjp tickets to rich people, they can't understand the situations and issues of poor residents 🙏
  • DEEPAK SINGH MANDRAWAL October 29, 2023

    महान भारत+महान लोकतंत्र विभिन्न जातियां+विभिन्न धर्म विभिन्न संस्कृति+विभिन्न त्योहार सर्वोपरि+राष्ट्र समर्पित+भारतीय
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
How PMJDY has changed banking in India

Media Coverage

How PMJDY has changed banking in India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 मार्च 2025
March 25, 2025

Citizens Appreciate PM Modi's Vision : Economy, Tech, and Tradition Thrive