पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयसीटी आधारित प्रगती या मल्टी -मोडल मंचाची 39 वी बैठक पार पडली. केंद्र आणि राज्य सरकारांचा यात समावेश असून प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी हा यामागचा उद्देश आहे.

बैठकीत आठ प्रकल्प आणि एका योजनेसह नऊ विषयांचा आढावा घेण्यात आला. आठ प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प रेल्वे मंत्रालयाचे होते तर रस्ते वाहतूक , महामार्ग मंत्रालय आणि ऊर्जा मंत्रालयाचे प्रत्येकी दोन प्रकल्प होते आणि एक प्रकल्प पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचा होता. या आठ प्रकल्पांची एकत्रित किंमत सुमारे 20,000 कोटी रुपये असून हे प्रकल्प बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांशी संबंधित आहेत. खर्चात वाढ होऊ नये म्हणून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला.

या संवादादरम्यान पंतप्रधानांनी पोषण अभियानाचाही आढावा घेतला. प्रत्येक राज्यात मिशन मोडमध्ये संपूर्ण सरकारी दृष्टीकोनातून पोषण अभियान राबवण्यात यावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. तळागाळातील मुलांच्या आरोग्य आणि पोषणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी स्वयं-सहायता गट (SHGs) आणि इतर स्थानिक संस्थांना सहभागी करून घेण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. यामुळे अभियानाची व्याप्ती सुधारण्यास मदत होईल.

प्रगतीच्या आतापर्यन्त 38 बैठका झाल्या असून 14.64 लाख कोटी रुपये किंमतीच्या 303 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Indian Markets Outperformed With Positive Returns For 9th Consecutive Year In 2024

Media Coverage

Indian Markets Outperformed With Positive Returns For 9th Consecutive Year In 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister remembers Pandit Madan Mohan Malaviya on his birth anniversary
December 25, 2024

The Prime Minister, Shri Narendra Modi, remembered Mahamana Pandit Madan Mohan Malaviya on his birth anniversary today.

The Prime Minister posted on X:

"महामना पंडित मदन मोहन मालवीय जी को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन। वे एक सक्रिय स्वतंत्रता सेनानी होने के साथ-साथ जीवनपर्यंत भारत में शिक्षा के अग्रदूत बने रहे। देश के लिए उनका अतुलनीय योगदान हमेशा प्रेरणास्रोत बना रहेगा"