पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रगती- म्हणजेच तत्पर प्रशासन आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या प्रयत्नातून योजनांची वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्याविषयीच्या आयसीटी आधारित बहु-पर्यायी प्रगती या मंचाची 38 वी बैठक झाली.
या बैठकीत आठ प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. रेल्वे मंत्रालयाचे चार प्रकल्प, उर्जा मंत्रालयाचे दोन प्रकल्प, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालय यांच्या प्रत्येकी एका प्रकल्पाचा यात समावेश होता. सुमारे 50,000 कोटी रुपयांचे हे प्रकल्प ओडिशा,आंध्रप्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि हरियाणा या सात राज्यातले आहेत.
प्रगतीच्या या आधीच्या 37 बैठकांमध्ये सुमारे 14.39 लाख कोटी रुपये खर्चाच्या 297 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे.