हांगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 च्या पुरुष टेनिस दुहेरी स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामकुमार रामनाथन आणि साकेथ मायनेनी या जोडीचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे:
“खूप चांगली बातमी. आपल्या टेनिस खेळाडूंना धन्यवाद. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल आमच्या रामकुमार रामनाथन आणि साकेथ मायनेनी या पुरुष दुहेरीच्या जोडीचे अभिनंदन. त्यांच्या अद्वितीय टीम वर्कने आपल्या सर्वांना थक्क करून सोडले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”
Great news thanks to our tennis players. Congratulations to our Men's Doubles pair of @ramkumar1994 and @SakethMyneni on winning an Asian Games Silver Medal. Their exceptional teamwork has left us all in awe. My best wishes for their upcoming endeavours. pic.twitter.com/aA8dnIpoWK
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2023