होंगझू इथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या लांब उडी क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीशंकर मुरलीचे अभिनंदन केले आहे.
एक्स समाज माध्यमावरील आपल्या टिप्पणीत पंतप्रधान म्हणतात:
“आशियाई क्रीडा स्पर्धेत अप्रतिम यश मिळवल्याबद्दल आणि रौप्य पदक जिंकल्याबद्दल विलक्षण असा लांब उडीपटू श्रीशंकर मुरलीचे अभिनंदन! त्यांनी येणाऱ्या पिढ्यांसाठी खरोखरच एक आदर्श समोर ठेवला आहे!”
Congratulations to the amazing Long Jumper @SreeshankarM on his resounding success and clinching the Silver medal at the Asian Games. He has indeed set a perfect example for generations to come! pic.twitter.com/pL83ah99Z9
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2023