पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या निवासस्थानी, 7, लोककल्याण मार्ग येथे बालकांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
यावेळी मुलांनी पंतप्रधानांना राखी बांधली, तसेच त्यांच्याशी विविध विषयांवर संवादही साधला. यावेळी बालकांनी चांद्रयान-3 मोहिमेला नुकत्याच मिळालेल्या यशाबद्दल त्यांच्या सकारात्मक भावना व्यक्त केल्या आणि आगामी आदित्य एल-1 मोहिमेबद्दल आपण उत्साही असल्याचंही सांगितलं
आपल्या या संवादादरम्यान मुलामुलींनी कविता ऐकवल्या आणि गाणीही गायली. या मुलांच्या बोलण्याने प्रभावित होऊन पंतप्रधानांनी त्यांना जनकल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या सरकारी योजनांसह विविध विषयांवर कविता रचण्यासाठी प्रोत्साहित केले. आत्मनिर्भरतेचे महत्त्व पटवून देत, पंतप्रधानांनी मुलांना ‘मेड इन इंडिया’ उत्पादने वापरण्याचा सल्लाही दिला.
या सोहळ्यात विविध विद्यार्थी, त्यांच्या शिक्षकांसह सहभागी झाले होते. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, वृंदावनातील विधवा तसेच इतर व्यक्तीही यावेळी उपस्थित होत्या.