चीन मध्ये हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुष दुहेरी रिकर्व्ह स्पर्धेत तिरंदाज हरविंदर सिंग आणि साहिल यांनी कांस्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
“आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरी रिकर्व्ह स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल आमचे पॅरा आर्चर्स, हरविंदर सिंग आणि साहिल यांचे अभिनंदन. त्यांची अतुलनीय कामगिरी आणि धनुर्विद्येतील नैपुण्य यामुळे देशाला अभिमान वाटत आहे. भारत त्यांचे यश मोठ्या उत्साहात साजरे करत आहे.” असे पंतप्रधानांनी एक्स पोस्ट वर लिहिले आहे.
Congratulations to our Para Archers, @ArcherHarvinder and Sahil, for winning the Bronze medal in Men's Doubles Recurve - Open at the Asian Para Games. Their incredible performance and precision with the arrow have made India proud. India celebrates their well-deserved achievement… pic.twitter.com/BbF50FH2Rx
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2023