पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या हेप्टॅथलॉन 800 मीटर स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल नंदिनी आगसारा हिचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“महिलांच्या हेप्टॅथलॉन 800 मीटर स्पर्धेत नंदिनी अगासराने मिळवलेल्या अभूतपूर्व कांस्यपदकाचा आनंद भारत साजरा करत आहे. ती एक परिपूर्ण विजेती असून खेळ भावना आणि उत्कृष्टतेचे दर्शन घडवते. तिचे अभिनंदन आणि पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.”
India celebrates the phenomenal Bronze Medal by @AgasaraNandini in Women's Heptathlon 800m event. She is an absolute champion, personifying sporting spirit and excellence. Congrats to her and all the best for the endeavours ahead. pic.twitter.com/nMe1E5vDoO
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2023