चीनच्या हॅंगझाऊ इथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई पॅरा स्पर्धा 2022 च्या बॅडमिंटन महिला एकेरी SL3 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनदीप कौरचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे :-
“आशियाई पॅरा स्पर्धेत महिला एकेरी SL3 मध्ये कांस्य पदक मिळवत, मनदीप कौरने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिचे खूप खूप अभिनंदन आणि तिच्या पुढच्या सर्व प्रयत्नांसाठी शुभेच्छा.”
A remarkable achievement by Mandeep Kaur as she secures the Bronze Medal in Women's Singles SL3 at the Asian Para Games. Congrats to her and all the best for the endeavours ahead. pic.twitter.com/aQCPP2hI7y
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2023