पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘वीर बाल दिवस’ या कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी मुलांनी सादर केलेले पठण आणि मार्शल आर्टची तीन प्रदर्शने पाहिली. यावेळी पंतप्रधानांनी दिल्लीतील तरुणांच्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
वीर साहिबजादे यांच्या अमर बलिदानाचे देश नित्य स्मरण करत आहे आणि स्वातंत्र्याच्या अमृत काळात वीर बाल दिवसाचा एक नवा अध्याय भारतासाठी उलगडत असताना वीर साहिबजादे यांच्याकडून प्रेरणा घेत आहे, असे पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. पंतप्रधानांनी गेल्या वर्षी याच दिवशी साजरा करण्यात आलेल्या पहिल्या वीर बाल दिवसाच्या सोहळ्याचे स्मरण केले. वीर साहिबजादे यांच्या शौर्याच्या कहाण्यांनी संपूर्ण देशाला प्रकाशमान केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “वीर बाल दिवस हे भारतीयत्वाच्या रक्षणासाठी कोणतीही सीमा न बाळगता धाडस करण्याच्या वृत्तीचे प्रतीक आहे”,असे त्यांनी सांगितले. “हा दिवस आपल्याला शौर्याच्या पराकाष्ठेला वयाचे बंधन नसते याची आठवण करून देतो” असेही ते म्हणाले. या पर्वाला शीख गुरूंच्या वारशाचा उत्सव म्हणत पंतप्रधानांनी गुरु गोविंद सिंग जी आणि त्यांच्या चार वीर साहिबजादांचे धैर्य आणि आदर्श आजही प्रत्येक भारतीयाला प्रोत्साहित करत असल्याचे सांगितले. “वीर बाल दिवस ही अतुलनीय धैर्याने शूरवीरांना जन्म देणाऱ्या त्या मातांना राष्ट्रीय श्रद्धांजली आहे”, असे सांगून पंतप्रधानांनी बाबा मोती राम मेहरा यांच्या कुटुंबाने केलेल्या बलिदानाचे आणि दिवाण तोडरमल यांच्या समर्पणाचे स्मरण केले. गुरुंप्रती असलेली ही खरी भक्ती, राष्ट्राप्रती भक्तीची ज्योत प्रज्वलित करते, असे पंतप्रधान म्हणाले.
अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संयुक्त अरब अमिराती आणि ग्रीस या देशांनी वीर बाल दिवसाशी संबंधित कार्यक्रम आयोजित केल्यामुळे आता वीर बाल दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जात असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. चमकौर आणि सरहिंदच्या लढाईच्या अतुलनीय इतिहासाचे स्मरण करून, हा इतिहास विसरता येणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले. भारतीयांनी क्रूरता आणि तानाशाहीला सन्मानाने कसे तोंड दिले याची त्यांनी आठवण केली.
जगानेही आपल्या वारशाची तेव्हाच दखल घेतली जेव्हा आपण आपल्या वारशाचा योग्य सन्मान करण्यास सुरुवात केली हे पंतप्रधान मोदींनी निदर्शनास आणून दिले. "आज जेव्हा आपण आपल्या वारशाचा अभिमान बाळगतो तेव्हा जगाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे", असे ते म्हणाले. आजचा भारत गुलामगिरीची मानसिकता दूर करत आहे तसेच देशातील क्षमता, प्रेरणा आणि लोकांवर पूर्ण विश्वास आहे याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. "आजच्या भारतासाठी, साहिबजादांचे बलिदान प्रेरणादायी आहे." तसेच भगवान बिरसा मुंडा आणि गोविंद गुरू यांचे बलिदान संपूर्ण देशाला प्रेरणा देत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
जग भारताला संधींच्या अग्रस्थानी ठेवत आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. अर्थव्यवस्था, विज्ञान, संशोधन, क्रीडा आणि मुत्सद्देगिरी या जागतिक समस्यांमध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला. म्हणूनच, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या “यही समय है सही समय है” या आपल्या स्पष्ट आवाहनाचा पुनरुच्चार केला. "ही भारताची वेळ आहे, पुढील 25 वर्षे भारताच्या क्षमतांचे प्रदर्शन करतील", असे ते म्हणाले. पंच प्रण पाळण्याची गरज आणि एक क्षणही वाया घालवू नये यावर त्यांनी भर दिला.
अनेक युगायुगांतून एकदा अनुभवास येतो, अशा एका कालखंडातून भारत जात आहे, यावर भर देताना पंतप्रधान म्हणाले, भारताचा सुवर्णकाळ निश्चित करतील, असे अनेक घटक स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात, एकत्र आले आहेत,असे मोदी म्हणाले. भारताच्या युवा शक्तीला महत्व आहे, असे सांगून पंतप्रधानांनी नमूद केले,की आज देशातील युवकांची संख्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात असलेल्या संख्येपेक्षा खूप जास्त आहे,आणि ही सध्याची युवा पिढी देशाला विक्रमी उंचीवर नेऊ शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्ञानाच्या शोधातील सर्व अडथळे दूर करणारा नचिकेत, लहान वयात 'चक्रव्यूह' भेदणार अभिमन्यू, ध्रुव आणि त्याची तपश्चर्या, अगदी लहान वयात साम्राज्याचे नेतृत्व करणारा मौर्य राजा चंद्रगुप्त, एकलव्य आणि त्यांचे गुरू द्रोणाचार्य, खुदीराम बोस, बटुकेश्वर दत्त, कनकलता बरुआ, राणी गैयदिनल्यू, बाजी राऊत तसेच देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या इतर अनेक राष्ट्रीय वीरांचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.
"आगामी 25 वर्षे आपल्या तरुणांसाठी मोठ्या संधी निर्माण करत आणत आहेत" यावर भर देत पंतप्रधान अगदी स्पष्टपणे सांगितले,की ते कोणत्याही प्रदेशात किंवा समाजात जन्माला आले असोत, भारतातील तरुण अमर्याद स्वप्ने पहात असतात. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सरकारकडे एक सुस्पष्ट आराखडा आणि सम्यक दृष्टीकोन आहे".राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 10 हजार अटल टिंकरिंग लॅब्स आणि उत्साही स्टार्टअप संस्कृती सक्षम करण्याचा उल्लेख करून त्यांनी याबाबत तपशीलवार माहिती दिली.त्यांनी मुद्रा योजनेच्या सहकार्याने उदयास आलेल्या गरीब वर्गातील तसेच अनुसूचित जाती/ जमाती आणि मागासलेल्या समाजातील 8 कोटी नवउद्योजकांचाही उल्लेख केला.
अलीकडील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील भारतीय खेळाडूंच्या यशावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी नमूद केले, की बहुतेक खेळाडू ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय खेलो इंडिया मोहिमेला दिले ज्यामुळे त्यांच्या घराजवळ त्यांना उत्तम क्रीडा आणि प्रशिक्षण सुविधा मिळत आहेत आणि ज्याची निवड प्रक्रिया पारदर्शक असते. युवकांच्या कल्याणाला प्राधान्य दिल्याचा हा परिणाम आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या स्वप्नाचा अर्थ पंतप्रधानांनी यावेळी विशद केला. याचा सर्वात जास्त लाभ युवकांना होईल आणि याचा अर्थ उत्तम आरोग्य, शिक्षण, संधी, नोकऱ्या, जीवनाचा दर्जा आणि उत्पादनांचा दर्जा हा आहे, असे ते म्हणाले. युवकांना विकसित भारताच्या स्वप्नांशी आणि संकल्पाशी जोडण्याच्या देशव्यापी मोहिमेबद्दल पंतप्रधानांनी तरुण श्रोत्यांना अवगत केले. त्यांनी प्रत्येक युवकाला MY-Bharat पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले. "हा मंच आता देशातील युवक युवतींसाठी एक मोठी संस्था बनत आहे, असेही ते पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी तरुणांना त्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा सल्ला दिला कारण जीवनात इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी ते महत्त्वाचे आहे.स्वतःसाठी काही मूलभूत नियम बनवण्याची आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना त्यांनी समस्त युवावर्गाला यावेळी केली. शारीरिक व्यायाम, डिजिटल माध्यमांना काही काळ दूर ठेवून, विश्रांती देणे(डिजिटल डिटॉक्स), मानसिक तंदुरुस्ती,या गोष्टी आव्हानात्मक बनल्या असून त्याकरिता पुरेशी झोप आणि आहारात श्रीअन्न किंवा बाजरीचा समावेश करावा,असे आवाहन पंतप्रधानांनी केले.पंतप्रधान मोदी यांनी समाजाला असलेल्या अंमली पदार्थांच्या धोक्याकडेही यावेळी निर्देश केला आणि एक राष्ट्र आणि समाज म्हणून एकत्र येऊन त्याचा सामना करण्यावर भर दिला.त्यांनी सरकार आणि कुटुंबांसह सर्व धर्मांतील गुरूंना अंमली पदार्थांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू करण्याचे आवाहन केले. सक्षम आणि सशक्त युवा शक्तीसाठी “सब का प्रयास” अत्यावश्यक आहे,”असे सांगत आपल्या गुरूंनी दिलेली ‘सबका प्रयास’ही शिकवणच भारताला एक विकसित राष्ट्र बनवेल हे लक्षात ठेवा, असे पंतप्रधान आपल्या
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबीन इराणी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर, यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
सहभागात्मक कार्यक्रम आयोजित करत साहिबजादेच्या अनुकरणीय धैर्याची कहाणी नागरिकांना, विशेषतः लहान मुलांना समजावून सांगता येईल आणि त्यांना शिक्षित करता येईल यासाठी वीर बाल दिन देशभरात सरकार आज साजरा करत आहे. देशभरातील शाळा आणि बालसंगोपन संस्थांमध्ये साहिबजादांची जीवनकथा आणि त्यागाची माहिती देणारे डिजिटल प्रदर्शन प्रदर्शित केले जाईल. ‘वीर बाल दिवस’ हा चित्रपटही देशभर प्रदर्शित होणार आहे.तसेच,MYBharat आणि MyGov पोर्टलद्वारे प्रश्नमंजुषासारख्या विविध ऑनलाइन स्पर्धा आयोजित केल्या जातील.
श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादास बाबा जोरावर सिंगजी आणि बाबा फतेह सिंहजी,
यांच्या हौतात्म्यास वंदन म्हणून साठी 26 डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा दिनांक 9 जानेवारी 2022 रोजी श्री गुरू गोविंद सिंग यांच्या प्रकाश पर्व या दिवशी, पंतप्रधानांनी घोषणा केली होती.
वीर बाल दिवस भारतीयता की रक्षा के लिए, कुछ भी कर गुजरने के संकल्प का प्रतीक है: PM @narendramodi pic.twitter.com/dk0Fnyu4sw
— PMO India (@PMOIndia) December 26, 2023
माता गुजरी, गुरु गोबिंद सिंह और उनके चारों साहिबजादों की वीरता और आदर्श, आज भी हर भारतीय को ताकत देते हैं: PM @narendramodi pic.twitter.com/QR5oVFlRy5
— PMO India (@PMOIndia) December 26, 2023
हम भारतीयों ने स्वाभिमान के साथ अत्याचारियों का सामना किया: PM @narendramodi pic.twitter.com/KZnuhHy64F
— PMO India (@PMOIndia) December 26, 2023
आज जब हम अपनी विरासत पर गौरव कर रहे हैं, तब दुनिया का नज़रिया भी बदला है: PM @narendramodi pic.twitter.com/MgaWsJW2B0
— PMO India (@PMOIndia) December 26, 2023
आज के भारत को अपने लोगों पर, अपने सामर्थ्य पर, अपनी प्रेरणाओं पर भरोसा है: PM @narendramodi pic.twitter.com/35BXZ2WOY7
— PMO India (@PMOIndia) December 26, 2023
आज पूरी दुनिया भारतभूमि को अवसरों की भूमि मान रही है: PM @narendramodi pic.twitter.com/YLunplAJm8
— PMO India (@PMOIndia) December 26, 2023
आने वाले 25 साल भारत के सामर्थ्य की पराकाष्ठा का प्रचंड प्रदर्शन करेंगे।
— PMO India (@PMOIndia) December 26, 2023
और इसके लिए हमें पंच प्राणों पर चलना होगा, अपने राष्ट्रीय चरित्र को और सशक्त करना होगा।
हमें एक पल भी गंवाना नहीं है, हमें एक पल भी ठहरना नहीं है। pic.twitter.com/JQZZw9SoJh
आने वाले 25 साल हमारी युवा शक्ति के लिए बहुत बड़ा अवसर लेकर आ रहे हैं। pic.twitter.com/BqprkFA2xo
— PMO India (@PMOIndia) December 26, 2023
साल 2047 का विकसित भारत कैसा होगा, उस बड़े कैनवस पर बड़ी तस्वीर हमारे युवाओं को ही बनानी है।
— PMO India (@PMOIndia) December 26, 2023
सरकार, एक दोस्त के रूप में आपके साथ मज़बूती से खड़ी हुई है: PM @narendramodi pic.twitter.com/vDMaoPXW3i
जब भारत का युवा फिट होगा, तो वो अपने जीवन में, अपने करियर में भी सुपरहिट होगा। pic.twitter.com/FIjP3zRRO3
— PMO India (@PMOIndia) December 26, 2023