संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि दुबईचे शासक महामहीम शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुबई येथे जागतिक सरकार शिखर परिषदेत सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाले. भविष्यातील सरकारांना आकार देणे" या परिषदेच्या संकल्पनेवर पंतप्रधानांनी विशेष मुख्य भाषण केले . 2018 मधील जागतिक सरकार शिखर परिषदेला देखील पंतप्रधान सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी या शिखर परिषदेत 10 राष्ट्राध्यक्ष आणि 10 पंतप्रधानांसह 20 जागतिक नेते सहभागी झाले. या जागतिक परिषदेला120 हून अधिक देशांची सरकारे आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी शासनाच्या बदलत्या स्वरूपावर आपले विचार मांडले. त्यांनी "किमान सरकार, कमाल शासन" या मंत्रावर आधारित भारतातील परिवर्तनवादी सुधारणांवर प्रकाश टाकला. भारताने लोककल्याण, सर्वसमावेशकता आणि शाश्वततेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे लाभ घेतला याबद्दल भारतीय अनुभव सामायिक करताना, प्रशासनासाठी मानवकेंद्रित दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. सर्वसमावेशक समाजाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लोकसहभाग, शेवटच्या माणसापर्यंत लाभ पोहोचवणे आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर भारताने केंद्रीत केलेले लक्ष त्यांनी अधोरेखित केले. जगाची परस्पर संलग्नता पाहता, भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारांनी सहकार्य केले पाहिजे आणि परस्परांकडून शिकले पाहिजे यावर पंतप्रधानांनी भर दिला. प्रशासन हे सर्वसमावेशक, तंत्रज्ञान-कुशल, स्वच्छ आणि पारदर्शक आणि हरित असणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या संदर्भात, सरकारांनी सार्वजनिक सेवेसाठी त्यांच्या दृष्टीकोनात - राहणीमान सुलभता, न्याय सुलभता, वाहतूक सुलभता, नवनिर्मितीची सुलभता आणि व्यवसाय सुलभतेला प्राधान्य देण्यावर त्यांनी भर दिला. हवामान बदलाच्या कृतीसाठी भारताची दृढ वचनबद्धता विशद करताना, त्यांनी लोकांना शाश्वत जगाच्या निर्मितीसाठी मिशन LiFE (पर्यावरणस्नेही जीवनशैली) मध्ये सामील होण्याचे आवाहन केले.
जगासमोरील विविध समस्या आणि आव्हानांवर पंतप्रधानांनी गेल्या वर्षी जी20 चे अध्यक्ष म्हणून भारताने बजावलेल्या नेतृत्वाची भूमिका स्पष्ट केली. या संदर्भात, त्यांनी ग्लोबल साऊथला भेडसावणाऱ्या विकासाच्या समस्यांना जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.
बहुउद्देशीय संस्थांमध्ये सुधारणा करण्याचे आवाहन करून, त्यांनी निर्णय घेताना ग्लोबल साऊथकडे अधिक लक्ष पुरवण्यावर जोर दिला. "विश्व बंधू" या भूमिकेवर आधारित भारत जागतिक प्रगतीमध्ये योगदान देत राहील, यावरही त्यांनी भर दिला.
आज हम 21वीं सदी में हैं।
— PMO India (@PMOIndia) February 14, 2024
एक तरफ दुनिया आधुनिकता की तरफ बढ़ रही, तो पिछली सदी से चले आ रहे चैलेंजेस भी उतने ही व्यापक हो रहे हैं: PM pic.twitter.com/0X9P0amW4o
आज विश्व को ऐसी सरकारों की जरूरत है जो Inclusive हों, जो सबको साथ लेकर चले। pic.twitter.com/ZGCaUGq9pd
— PMO India (@PMOIndia) February 14, 2024
Today, the world needs governments that prioritise:
— PMO India (@PMOIndia) February 14, 2024
Ease of Living,
Ease of Justice,
Ease of Mobility,
Ease of Innovation,
Ease of Doing Business. pic.twitter.com/eZFyvfrH7U
मैं मानता हूं कि सरकार का अभाव भी नहीं होना चाहिए और सरकार का दबाव भी नहीं होना चाहिए।
— PMO India (@PMOIndia) February 14, 2024
बल्कि मैं तो ये मानता हूं कि लोगों की ज़िंदगी में सरकार का दखल कम से कम हो, ये सुनिश्चित करना भी सरकार का काम है: PM pic.twitter.com/TlfAe2t8Zy
Minimum Government, Maximum Governance. pic.twitter.com/X3wALW9pj0
— PMO India (@PMOIndia) February 14, 2024
सबका साथ-सबका विकास के मंत्र पर चलते हुए हम Last Mile Delivery और सैचुरेशन की अप्रोच पर बल दे रहे हैं: PM pic.twitter.com/mnOzTaRkeX
— PMO India (@PMOIndia) February 14, 2024
Mitigating climate change. pic.twitter.com/mxEXR7QB5l
— PMO India (@PMOIndia) February 14, 2024