देशभरातील लोक संक्रांत आणि पोंगल मोठ्या उत्साहाने साजरे करतात: पंतप्रधान
कृतज्ञता, विपुलता आणि नूतनीकरणाचा हा उत्सव आपल्या संस्कृतीच्या कृषी परंपरांमध्ये खोलवर रुजलेला आहे: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी  आज त्यांचे मंत्रिमंडळातील  सहकारी  जी. किशन रेड्डी यांच्या निवासस्थानी संक्रांत आणि पोंगल उत्सवामध्ये सहभागी झाले.संपूर्ण देशभरातील लोक संक्रांत आणि पोंगल मोठ्या उत्साहाने साजरे करतात असे पंतप्रधान म्हणाले." कृतज्ञता, विपुलता आणि नूतनीकरणाचा हा उत्सव आपल्या संस्कृतीच्या कृषी परंपरांमध्ये खोलवर रुजलेला आहे", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:

"माझे मंत्रिमंडळातील सहकारी जी.किशन रेड्डी गारु  यांच्या निवासस्थानी संक्रांत आणि पोंगल उत्सवांना उपस्थित राहिलो.यानिमित्ताने एक उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम पहायला मिळाला.

 

देशभरातील लोक संक्रांत आणि पोंगल मोठ्या उत्साहाने साजरे करतात.कृतज्ञता,विपुलता आणि नूतनीकरणाचा हा उत्सव आपल्या संस्कृतीच्या कृषी परंपरांमध्ये खोलवर रुजलेला आहे.

 

संक्रांत आणि पोंगल निमित्त माझ्याकडून  हार्दिक शुभेच्छा.सर्वांना आनंद,उत्तम  आरोग्य लाभो आणि कापणी हंगाम समृद्ध राहो.”

@kishanreddybjp

 

 

संक्रात कार्यक्रमाची ही आणखी छायाचित्रे.