पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत झालेल्या गुरु नानक देव जींच्या 553व्या प्रकाश पर्व सोहळ्यात सहभागी झाले आणि त्यांनी प्रार्थना केली. यावेळी पंतप्रधानांचा शाल, सिरोपा आणि तलवार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्वांना गुरुपूरब आणि प्रकाश पर्वाच्या शुभ सोहळ्याच्या आणि देव दीपावलीच्या देखील शुभेच्छा दिल्या.
गुरु गोविंद सिंग जींचे 350वे प्रकाश पर्व, गुरु तेग बहादूरजींचे 400वे प्रकाश पर्व आणि गुरु नानक देव जींचा 550 वा प्रकाशोत्सव यांसारख्या महत्त्वाच्या प्रकाश पर्वांना साजरे करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या विशेष प्रसंगी मिळालेली प्रेरणा आणि आशीर्वाद नव्या भारताच्या उर्जेत वाढ करत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. प्रकाश पर्वाचा जो बोध शीख परंपरेमध्ये राहिला आहे, जे महत्त्व आहे आज देश त्याच तन्मयतेने सेवा आणि कर्तव्याच्या मार्गावर देश वाटचाल करत आहे. या पवित्र प्रसंगी गुरु कृपा, गुरुबाणी आणि लंगरमधील प्रसाद यांच्याविषयी वाटत असलेली श्रद्धा पंतप्रधानांनी व्यक्त केली. यामुळे केवळ आंतरिक शांतताच मिळत नाही तर देशासाठी, समाजासाठी समर्पित भावनेने काम करण्याची भावना देखील निर्माण होते, असे पंतप्रधान म्हणाले.
गुरु नानक देव जींच्या विचारांपासून प्रेरणा घेत देश 130 कोटी भारतीयांच्या कल्याणाच्या भावनेने पुढे जात आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. गुरु नानक देव जींच्या शिकवणीमध्ये आध्यात्मिक चिंतन, भौतिक समृद्धी आणि सामाजिक समरसतेची प्रेरणा देखील आहे, असे ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत काळात देशामध्ये आपल्या जुन्या वैभवाचा आणि आध्यात्मिक ओळखीचा अभिमान पुन्हा एकदा जागृत झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. कर्तव्याच्या सर्वोच्च भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी देशाने हा काळ कर्तव्य काळ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत काळात देश समता, समरसता, सामाजिक न्याय आणि एकतेसाठी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास च्या मंत्रावर चालत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “गुरुबाणीमधून आपल्याला जे मार्गदर्शन मिळाले होते तेच आपल्यासाठी परंपरा, आस्थेबरोबरच विकसित भारताचा दृष्टीकोन देखील आहे, असे त्यांनी सांगितले.
गुरु नानक देवजी यांची शाश्वत शिकवण अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले, “गुरु ग्रंथ साहिबच्या रूपाने आपल्याल्या जे अमृत मिळालं आहे, ते अतिशय गौरवास्पद आहे आणि काळ आणि भौगोलिक सीमांच्या पलीकडचे आहे. आपण हे देखील बघितलं आहे, जेव्हा संकट वाढते, तेव्हा या उपायांचे महत्व अधिकच वाढते. जगात असंतोष आणि अस्थिर वातावरण असताना, गुरु साहिबांची शिकवण आणि गुरु नानक देवजी यांचे आयुष्य जगाला दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवत आहे.” आपण गुरूंच्या आदर्शांचे जितके जास्त पालन करू, तितकी जास्त ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावना आपल्या मनात रुजत जाईल, जितके जास्त महत्व आपण मानवतेच्या मूल्यांना देऊ, तितक्या ठळकपणे आणि स्पष्टपणे गुरु साहिबची शिकवण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल.
पंतप्रधान म्हणाले की गुरु नानक देवजींच्या आशीर्वादाने, आम्हाला गेले 8 वर्ष महान शीख वारशाची सेवा करण्याचे भाग्य लाभले. गोबिंद घाट ते हेमकुंड साहिब पर्यंतच्या रोपवेची पायाभरणी आणि यात्रेकरूंच्या सोयीसाठी सुरु करण्यात आलेल्या दिल्ली - उना वंदे भारत एक्सप्रेसचा त्यांनी उल्लेख केला. गुरु गोविंद सिंगजी यांच्याशी संबंधित स्थळांचे विद्युतीकरण आणि दिल्ली - कटरा - अमृतसर एकस्प्रेस वे देखील यात्रेकरूंसाठी सोयीस्कर ठारतील. या प्रकल्पांवर सरकार 35 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. हे प्रयत्न सोयी सुविधा आणि पर्यटन क्षमातेच्याही पलीकडचे आहेत, आपल्या श्रद्धास्थानांची उर्जा, शीख वारसा, सेवा, प्रेम आणि समपर्ण याच्याशी हे संबधित आहे, असे पंतप्रधान म्हणाले. कर्तारपूर मार्गिका सुरु करणे, अफगाणिस्तानातून पवित्र गुरु ग्रंथ साहिब परत आणणे आणि साहिबजाद्यांच्या सर्वोच्च बलीदानाचा सन्मान म्हणून 26 डिसेंबर वीर बाल दिवस म्हणून घोषित करणे याचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला. “फाळणीच्यावेळी पंजाबच्या लोकांनी केलेल्या त्यागाच्या स्मरणार्थ देशाने विभाजन विभिशिका स्मृती दिन सुरु केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणून आम्ही फाळणीमुळे बाधित झालेल्या हिंदू - शीख कुटुंबांना भारताचे नागरिकत्व देण्याचा मार्ग सुरु करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे,” पंतप्रधान मोदी म्हणाले.
“मला पूर्ण विश्वास आहे, की गुरूंच्या आशीर्वादाने, भारत आपल्या शीख परंपरांचा गौरव वाढवत राहील आणि प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होत राहील,” पंतप्रधान म्हणाले.
Greetings on Guru Purab and Dev Deepavali. pic.twitter.com/uLejNJlqMh
— PMO India (@PMOIndia) November 7, 2022
मैं अपना और अपनी सरकार का बहुत बड़ा सौभाग्य मानता हूं कि गुरुओं के इतने अहम प्रकाश पर्व हमारी ही सरकार के दौरान आए: PM @narendramodi pic.twitter.com/pTPU4dm8yx
— PMO India (@PMOIndia) November 7, 2022
हर प्रकाश पर्व का प्रकाश देश के लिए प्रेरणापुंज का काम कर रहा है: PM @narendramodi pic.twitter.com/ptiKVYcPHS
— PMO India (@PMOIndia) November 7, 2022
Inspired by Guru Nanak Dev Ji's thoughts, the country is moving ahead with the spirit of welfare of 130 crore Indians. pic.twitter.com/5T00SsVP6v
— PMO India (@PMOIndia) November 7, 2022
जो मार्गदर्शन देश को सदियों पहले गुरुवाणी से मिला था, वो आज हमारे लिए परंपरा भी है, आस्था भी है, और विकसित भारत का विज़न भी है: PM @narendramodi pic.twitter.com/QKhywDTRYC
— PMO India (@PMOIndia) November 7, 2022
It is our constant endeavour to strengthen the Sikh traditions. pic.twitter.com/njOJwoNhJZ
— PMO India (@PMOIndia) November 7, 2022
हमारा प्रयास रहा है कि सिख विरासत को सशक्त करते रहें। pic.twitter.com/IndhMYhmhk
— PMO India (@PMOIndia) November 7, 2022
विभाजन में हमारे पंजाब के लोगों ने, देश के लोगों ने जो बलिदान दिया, उसकी स्मृति में देश ने विभाजन विभीषिका स्मृति दिवस की शुरुआत भी की है। pic.twitter.com/1QS3JrmuU5
— PMO India (@PMOIndia) November 7, 2022