महोदय,

  • आफ्रिकेच्या भूमीवर तुम्हा सर्व स्नेह्यांसमवेत उपस्थित राहून अतिशय आनंद होत आहे.
  • मी राष्ट्रपती रामाफोसा यांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी ब्रिक्स आउटरिच परिषदेमध्ये मला आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिका मधील देशांशी विचार सामायिक करण्याची संधी दिली.
  • गेल्या दोन दिवसांत, ब्रिक्सच्या सर्व चर्चांमध्ये आपण ग्लोबल साउथ देशांचे प्राधान्यक्रम आणि समस्या यांवर अधिक भर दिला आहे.
  • आम्हाला असे वाटते की ब्रिक्स तर्फे या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे सध्याच्या काळात  आवश्यक आहे.
  • आम्ही ब्रिक्स मंचाचा विस्तार करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.सर्व भागीदार देशांचे आम्ही स्वागत करतो.
  • जागतिक पातळीवरील संस्था आणि मंचांना अधिक प्रातिनिधिक आणि समावेशक स्वरूप देण्याच्या आमच्या प्रयत्नांच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे.

महोदय,

  • जेव्हा आम्ही ‘ग्लोबल साऊथ’ हा शब्द वापरतो तेव्हा तो केवळ राजकीय संज्ञा या अर्थाने वापरत नाही.
  • आपल्या सामायिक इतिहासात आपण वसाहतवाद आणि वर्णभेदाचा एकत्रितपणे विरोध केला आहे.
  • आफ्रिकेच्या भूमीवरच महात्मा गांधीजींनी अहिंसा आणि शांततापूर्ण प्रतिकार यासारख्या सामर्थ्यशाली संकल्पना विकसित केल्या, त्यांची पारख करून  घेतली आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांचा वापर केला.
  • त्यांची विचारपद्धती आणि विचारांनी नेल्सन मंडेला यांच्यासारख्या महान नेत्यांना प्रेरणा दिली.
  • इतिहासाच्या या मजबूत आधारावर आम्ही आपल्या आधुनिक संबंधांना नवे स्वरूप देत आहोत.

महोदय,

  • भारताने आफ्रिकेशी असलेल्या संबंधांना नेहमीच अधिक प्राधान्य दिले आहे.
  • उच्च-स्तरीय बैठकांसोबतच आम्ही आफ्रिकेत 16 नवे दूतावास सुरु केले आहेत.
  • भारत आज आफ्रिकेचा चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापारविषयक भागीदार आहे आणि पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा गुंतवणूकदार देश आहे.
  • सुदान, बुरुंडी आणि रवांडा मधील विद्युतनिर्मिती प्रकल्प असोत किंवा इथियोपिया आणि मलावी मधील साखर कारखाने
  • मोझांबिक, कोत दिव्वार आणि एस्वातिनीमधील तंत्रज्ञान पार्क्स असोत किंवा टांझानिया आणि युगांडा मध्ये भारतीय विद्यापीठांतर्फे सुरु करण्यात आलेली केंद्र असोत,
  • भारताने आफ्रिकेतील देशांची क्षमता बांधणी  आणि पायाभूत सुविधा विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे.
  • वर्ष 2063 च्या ध्येयधोरणाअंतर्गत आफ्रिकेला भविष्यातील जागतिक उर्जाकेंद्र बनवण्याच्या प्रवासात भारत एक विश्वसनीय आणि जवळचा भागीदार आहे.
  • आफ्रिकेतील डिजिटल दरी कमी करण्यासाठी आम्ही टेली-एज्युकेशन आणि टेली-मेडिसिन या क्षेत्रांमध्ये पंधरा हजारांहून अधिक शिष्यवृत्ती दिल्या आहेत.
  • आम्ही नायजेरिया, इथियोपिया आणि टांझानिया या भागात संरक्षण अकादमी आणि महाविद्यालयांची स्थापना केली आहे.
  • बोत्सवाना, नामिबिया, युगांडा, लेसोथो, झाम्बिया, मॉरीशस, सेशेल्स आणि टांझानिया येथे प्रशिक्षण देण्याच्या हेतूने पथके तैनात केली आहेत.
  • सुमारे 4400 भारतीय शांतीदूत, ज्यांच्यात महिलांचा देखील समावेश आहेत, ते आफ्रिकेत शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी योगदान देत आहेत.
  • दहशतवाद आणि पायरसी यांच्या विरोधातील लढाईत देखील आम्ही आफ्रिकी देशांसोबत एकत्र येऊन काम करत आहोत.
  • कोविड महामारीच्या कठीण काळात आम्ही अनेक देशांना खाद्य पदार्थ आणि लसीचा पुरवठा केला आहे.
  • आता आम्ही आफ्रिकेतील देशांसमवेत कोविड आणि इतर लसींच्या संयुक्त निर्मितीसाठी देखील काम करत आहोत.
  • मोझांबिक आणि मलावी मधील चक्रीवादळ असो किंवा मादागास्कर येथे आलेले पूर, भारत सर्वप्रथम प्रतिसाद देणारा देश म्हणून नेहमीच आफ्रिकेच्या खांद्याला खांदा भिडवून उभा आहे.

महोदय,

  • लॅटिन अमेरिकेपासून मध्य आशियापर्यंत
  • पश्चिम आशियापासून आग्नेय आशियापर्यंत,
  • हिंद-प्रशांत परिसरापासून हिंद-अटलांटिक पर्यंत,
  • भारत सर्व देशांना एका कुटुंबाच्या रुपात संकल्पित करतो.
  • वसुधैव कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे ही संकल्पना म्हणजे हजारो वर्षांपासून आमच्या जीवनशैलीचा पाया राहिला आहे.
  • आमच्या जी-20 अध्यक्षतेचा देखील हाच गुरुमंत्र आहे.
  • ग्लोबल साउथ  देशांच्या समस्यांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी आम्ही तीन आफ्रिकी देशांना तसेच अनेक विकसनशील देशांना अतिथी देश म्हणून आमंत्रित केले आहे.
  • आफ्रिकी महासंघाला जी-20 समूहाची स्थायी सदस्यता देण्याचा प्रस्ताव देखील भारताने मांडला आहे.

महोदय,

  • मला वाटते की ब्रिक्स आणि आज उपस्थित असलेले सर्व देश मिळून अधिकार विकेंद्रित  जगाला बळकट करण्यात मदत करू शकतील.
  • जागतिक संस्थेला प्रातिनिधिक बनवण्यासाठी आणि समर्पक रूप देण्यासाठी त्यांच्या सुधारणांना गती देता येईल.
  • दहशतवादाला विरोध, पर्यावरणाचे संरक्षण, हवामानविषयक उपक्रम, सायबर सुरक्षा, अन्न आणि आरोग्य सुरक्षा, उर्जा सुरक्षितता, लवचिक पुरवठा साखळीची निर्मिती हे आमचे सामायिक हिताचे विषय आहेत. सहयोगी संबंधाच्या अमर्याद शक्यता आहेत.
  • मी तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय सौर आघाडी; एक सूर्य,एक जग,एक ग्रीड; आपत्तीप्रती लवचिक  पायाभूत सुविधांसाठी आघाडी; एक पृथ्वी, एक आरोग्य, बिग कॅट आघाडी, पारंपरिक औषधांसाठीचे जागतिक केंद्र यांसारख्या आमच्या आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो.
  • भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यंत्रणेशी स्वतःला जोडून घेण्यासाठी, आपापल्या विकासासाठी त्यांचा लाभ  घेण्यासाठी मी तुम्हा सर्वांना आमंत्रण देतो.
  • आम्हाला आमचे अनुभव आणि क्षमता तुम्हा सर्वांशी सामायिक करण्यात आनंद आहे.
  • आपल्या एकत्रित प्रयत्नांमुळे आपल्याला सर्व आव्हानांचा एकत्रितपणे सामना करण्यासाठी एक नवा आत्मविश्वास मिळेल असा विश्वास मला वाटतो.
  • मी पुन्हा एकदा या प्रसंगी तुम्हा सर्वांचे, विशेषतः राष्ट्रपती रामाफोसा यांचे आभार मानतो.

धन्यवाद.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi