राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प,
मित्रांनो,बंधू भगिनीनो आणि वृत्तप्रतिनिधी,
सर्वप्रथम अगदी पहिल्या ट्विटपासून आमच्या या भेटीच्या सांगतेपर्यंत, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी माझे जे मैत्रीपूर्ण स्वागत केले, व्हाईट हाऊस आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी यांनी जे आदरातिथ्य केले, त्याबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी माझ्यासोबत जो वेळ घालवला त्यासाठीही मी कृतज्ञ आहे. माझा हा दौरा आणि आपल्या दोघांमध्ये आजच्या बैठकीत झालेली चर्चा, दोन्ही देशांच्या सहकार्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचे पान ठरेल यात शंका नाही.
मित्रांनो, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि माझ्यात आज झालेली बैठक अनेक दृष्टीने खूप महत्वाची ठरली. याची कारणे म्हणजे –
-
ही बैठक परस्परविश्वासावर आधारलेली होती.
-
त्याचे कारण म्हणजे आमची मूल्ये, प्राधान्यक्रम, चिंता आणि आवडीनिवडी समान आहेत.
-
कारण भारत आणि अमेरिकेदरम्यानचे परस्पर सहकार्य आणि सहभागाचे यश परिसीमेवर असतांना त्या यशावर ही बैठक आधारित होती.
-
आम्ही दोन्ही राष्ट्रे विकासाचे जागतिक इंजिन आहोत.
-
दोन्ही देश, समाजाचा चहूदिशांनी विकास आणि त्याची प्रगती हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आणि माझे प्रमुख लक्ष्य आहे आणि पुढेही राहील.
-
कारण दहशतवादासारख्या जागतिक आव्हानांपासून आपल्या समाजाची सुरक्षा करणे ही माझी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची प्राथमिकता आहे.
-
भारत आणि अमेरिका या दोन विशाल लोकशाही राष्ट्रांच्या सहकार्यातून सशक्तीकरण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
मित्रांनो,
या दोन्ही देशांमधली राजनैतिक भागीदारी इतकी दृढ आणि व्यापक आहे की तिने मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रांना स्पर्श केला आहे. आमच्या दोघांमध्ये आज झालेल्या चर्चेत, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि मी भारत आणि अमेरिकेच्या संबंधामधल्या प्रत्येक पैलूवर विस्ताराने चर्चा केली. दोन्ही देश अशा द्विपक्षीय संबंधांसाठी वचनबद्ध आहेत जे संबध उभय देशांची भागीदारी एका नव्या उंचीवर घेऊन जातील. या संदर्भात,दोन्ही देशात उत्पादकता वाढवणे, विकास, रोजगार निर्मिती आणि तंत्रज्ञान याबाबत आमच्यात मजबूत सहकार्य निर्माण करणे आणि या सहकार्यातली गती पुढेही कायम ठेवणे, यावर आमचा भर राहील.
भारताच्या सामाजिक आर्थिक प्रगतीसाठी आम्ही सुरु केलेल्या पथदर्शी कार्यक्रमात आम्ही अमेरिकेला सर्वात मोठा भागीदार समजतो. मला विश्वास आहे की नवा भारत घडवण्याची माझी दृष्टी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा “अमेरिकेला पुन्हा महान बनवूया “ या दोन्हीमधली समान दृष्टी आमच्या परस्पर सहकार्याचे नवे आयाम निर्माण करेल. माझे असे स्पष्ट मत आहे की मजबूत आणि यशस्वी अमेरीकेतच भारताचे हित सामावलेले आहे. तसेच, भारताचा विकास आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे वाढते महत्व, भारताची भूमिका अमेरिकेच्या हिताची आहे. व्यापार, वाणिज्य आणि गुंतवणुकीत परस्पर विकास करणे याला आमचे संयुक्त प्राधान्य असेल. या संदर्भात, तंत्रज्ञान, संशोधन आणि ज्ञान आधारित अर्थव्यवस्था अशा क्षेत्रात सहकार्य वाढवणे आणि ते अधिक दृढ करणे हे आमच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक असेल. यासाठी आमच्यातली यशस्वी डिजिटल भागीदारी अधिक सुदृढ करण्यासाठी आम्ही निश्चितच पावले उचलू.
मित्रांनो,
आम्ही केवळ संधींचे सोबती नाही, तर आज दोन्ही देशांसमोर असलेल्या आणि भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठीही आम्ही परस्परांची साथ देत आहोत, देणार आहोत. आज झालेल्या बैठकीत आम्ही दहशतवाद, कट्टरतावाद आणि उग्रवादामुळे संपूर्ण जगात निर्माण झालेले गंभीर संकट आणि आव्हानांवर चर्चा केली. दहशतवादाशी लढणे आणि दहशतवाद्यांना संरक्षण देणाऱ्या जागा नष्ट करणे, आमच्या सहकार्याचा एक महत्वाचा भाग असेल. दहशतवादी संघटनांशी संबंधित समान चिंता आणि धोक्यांविषयी मिळालेली गुप्त माहिती आम्ही परस्परांना देऊ, या संदर्भात नीती समन्वय शक्य तितका वाढवला जाईल. आम्हा दोघांमध्ये प्रादेशिक विषयांवरही सविस्तर चर्चा झाली. दहशतवादामुळे अफगाणिस्तानमध्ये वाढत असलेली अस्थिरता आमच्यासाठी समान चिंताजनक बाब आहे. अफगाणिस्तानची पुनर्बान्धणी आणि त्याच्या सुरक्षेसाठी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अफगाणिस्तानात शांतता आणि स्थैर्य कायम राहावे या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी आम्ही अमेरिकेशी सल्लामसलत, संवाद आणि समन्वय सतत ठेवत राहू.
भारत-प्रशांत महासागर क्षेत्रात समृद्धी, शांतता आणि स्थैर्य कायम ठेवणे हा आमच्या राजनैतिक सहकार्याचा प्रमुख उद्देश आहे. या क्षेत्रात संधीचा विस्तार आणि समोर येत असलेली आव्हाने यामुळे आमच्या परस्पर राजनैतिक हितासाठी हे सहकार्य कायमच राहणे आवश्यक ठरणार आहे. याच क्षेत्रात आम्ही अमेरिकेसोबत काम करणे पुढेही सुरूच ठेवू. सुरक्षेच्या विषयातल्या आव्हानांचा सामना करताना, आमच्यात संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात वाढलेले सहकार्य अतिशय महत्वपूर्ण आहे. याविषयीही आम्ही सविस्तर चर्चा केली. भारताच्या संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी अमेरिकेने केलेल्या मदतीविषयी मी समाधान व्यक्त करतो. याचप्रमाणे सागरी सुरक्षिततेच्या क्षेत्रातही भविष्यात परस्पर सहकार्य वाढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांदरम्यान, द्विपक्षीय संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि उत्पादन भागीदारी वाढवणे, दोघांसाठी हितकारक ठरेल. अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांसंदर्भात सामाईक हितांविषयी आम्ही चर्चा केली. या संदर्भात, आंतरराष्ट्रीय संस्था आणि क्षेत्रात भारताला सदस्यत्व देण्याच्या मागणीला अमेरिकेने सातत्याने पाठींबा दिला असून, त्यासाठी मी आभार व्यक्त करतो. हे दोन्ही देशांच्या हिताचेच आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ,
भारत आणि माझ्याविषयी तुम्ही जो स्नेह दाखवला, त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि द्विपक्षीय संबंधांसाठी तुम्ही दर्शवलेल्या वचनबद्धतेविषयी मी आपले अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की आपल्या नेतृत्वाखाली आपली ही मैत्री आणि राजनैतिक भागीदारी अधिकाधिक मजबूत, सकारात्मक होऊन एका नव्या उंचीवर पोहोचेल.
उद्योग जगतातल्या यशस्वी कारकीर्दीचा तुमचा अनुभव, आपल्या सहकार्याला अधिकच गतिमान आणि पुरोगामी दिशा देईल. भारत- अमेरिकेच्या या दौऱ्यात, अमेरिकेला एक उत्तम नेतृत्व दिल्याबाद्द्ल मी आपले अभिनंदन करतो. दोन्ही देशांच्या संयुक्त विकासाच्या या प्रवासात मी सदैव आपल्यासोबत असेन ,अशी तुम्हाला खात्री देतो.
मान्यवर,
आजचा माझा दौरा आणि आपल्यासोबत झालेली चर्चा अतिशय यशस्वी ठरली. हे व्यासपीठ सोडण्यापूर्वी मी आपल्याला सहकुटुंब भारत भेटीचे आमंत्रण देतो. मला आशा आहे की आपण मला भारतात आपले स्वागत-सत्कार करण्याची संधी द्याल. आपण इथे जो माझा आदर-सत्कार केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी यांचे आभार मानतो.
धन्यवाद !!
Great honour to welcome the leader of the world's largest democracy: @POTUS @realDonaldTrump during the joint press meet
— PMO India (@PMOIndia) June 26, 2017
You have a true friend in the White House...our ties have never been stronger and better: @POTUS
— PMO India (@PMOIndia) June 26, 2017
Always had admiration for your country, people, culture, heritage and traditions: @POTUS to PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 26, 2017
India and USA will always be together in friendship and respect: @POTUS
— PMO India (@PMOIndia) June 26, 2017
I would like to thank @POTUS for his kind words about India: PM @narendramodi pic.twitter.com/FhSeFT15Hf
— PMO India (@PMOIndia) June 26, 2017
Both India and USA are global engines of growth. Eliminating terrorism is among the topmost priorities for us: PM @narendramodi pic.twitter.com/SLKYvGWj87
— PMO India (@PMOIndia) June 26, 2017
We held talks on wide range of issues pertaining to the India-USA relationship: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 26, 2017
We consider USA a valued partner in our flagship programmes: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 26, 2017
Trade, commerce and investment are key areas. Technology, innovation and knowledge economy are also areas were are actively looking at: PM
— PMO India (@PMOIndia) June 26, 2017
We discussed the problems arising due to terrorism and radicalisation: PM @narendramodi on talks with @POTUS
— PMO India (@PMOIndia) June 26, 2017
We agreed to work closely on boosting maritime trade and cooperation: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 26, 2017
I laud your commitment towards strong India-USA bilateral relations: PM @narendramodi to @POTUS
— PMO India (@PMOIndia) June 26, 2017