पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर दिले.
सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत पंतप्रधानांनी सभागृहाला आश्वस्त केले की यामुळे भारताच्या कुठल्याही नागरिकावर परिणाम होणार नाही.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी पूर्वीच्या सरकारांच्या विचार प्रक्रियांचा संदर्भ घेतला. ते म्हणाले की, त्यांचेही विचार असेच होते.
नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला. नेहरु यांनी शेजारील देशांमधील अल्पसंख्याक शरणार्थींना भारताकडून संरक्षण देण्यासाठी आवश्यकता भासल्यास कायद्यात सुधारणा करण्याची तयारी दर्शवली होती.
पंतप्रधान म्हणाले की, काही राजकीय पक्ष भारतात विभाजनाचा पाकिस्तानचा कार्यक्रम राबवत आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे कुठल्याही भारतीय नागरिकाचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी लोकसभेत दिले.
ते म्हणाले, “मला हे स्पष्ट करायचे आहे की सीएएच्या अंमलबजावणीमुळे भारतीय नागरीक, मग ते कुठल्याही धर्म किंवा पंथाचे असोत, त्यांच्यावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही.”
Much has been said about CAA, ironically by those who love getting photographed with the group of people who want ‘Tukde Tukde’ of India: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 6, 2020