पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरी माटी मेरा देश मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि देशभरातील मातीने तयार केलेली 'वाटिका' 'एक भारत श्रेष्ठ भारत'चा आदर्श साकार करेल अशी आशा व्यक्त केली आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ‘एक्स’ संदेशात म्हटले:
"खूप खूप शुभेच्छा! 'मेरी माटी-मेरा देश' मोहिमेमुळे आमची एकता आणि अखंडतेची भावना अधिक दृढ होणार आहे. मला खात्री आहे की या अंतर्गत देशभरातून गोळा केलेल्या मातीपासून एक अशी अमृत वाटिका तयार केली जाईल जी 'एक भारत श्रेष्ठ भारत' ही संकल्पना साकार करेल. या 'अमृत कलश यात्रे'त मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा.
बहुत-बहुत शुभकामनाएं! ‘मेरी माटी-मेरा देश’ अभियान हमारी एकता और अखंडता की भावना को और सशक्त करने वाला है। मुझे विश्वास है कि इसके तहत देशभर से जमा की गई मिट्टी से एक ऐसी अमृत वाटिका का निर्माण होगा, जो ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ की कल्पना को साकार करेगा। आइए, इस 'अमृत कलश यात्रा' में… https://t.co/Dgucz1eZwK
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2023