पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वी बर्लिनला पोहोचले, तिथे ते जर्मन चँसेलरशी चर्चा करणार असून इतर कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान मोदी ट्विटमध्ये म्हणतात, "बर्लिनला पोहोचलो. आज मी चँसेलर ओलाफ शोल्झ यांच्याशी चर्चा करणार आहे, व्यवसाय धुरीणांशीही संवाद साधणार आहे त्याशिवाय आणखी एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित करणार आहे. या भेटीमुळे भारत आणि जर्मनी यांच्यातील मैत्रीला बळ मिळेल, याचा मला विश्वास आहे. "