पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणात कैथल येथे झालेल्या अपघातात जीव गमावलेल्यांच्या जवळच्या वारसाला दोन लाख रुपयांची तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ समाजमाध्यमावर म्हटले आहे,
"पंतप्रधानांनी PMNRF म्हणजे पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून कैथल, हरियाणा येथील दुर्घटनेतील मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये मदत मंजूर केली आहे. या अपघातातील जखमींना 50 हजार रुपये मदत दिली जाईल.
The Prime Minister has approved an ex-gratia of Rs. 2 lakhs from PMNRF for the next of kin of each deceased in the mishap in Kaithal, Haryana. The injured would be given Rs. 50,000 each. https://t.co/E08nJ99zS5
— PMO India (@PMOIndia) October 12, 2024