जीईएम या सरकारी बाजार मंचाने 2021-22 या आर्थिक वर्षात 1 लाख कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. यापैकी 57% किंमतीच्या ऑर्डर्स एमएसएमई क्षेत्रातील उत्पादनांसाठी आल्यामुळे हा जीईएम मंच एमएसएमई उद्योगांचे विशेषत्वाने सशक्तीकरण करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“@GeM_India या सरकारी बाजार मंचाने 2021-22 या आर्थिक वर्षात 1 लाख कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळविल्याचे समजल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही अत्यंत भरीव वाढ झाली आहे. जीईएम मंच एमएसएमई उद्योगांचे विशेषत्वाने सशक्तीकरण करत आहे, कारण या एका वर्षातील ऑर्डर्सपैकी 57% किमतीच्या ऑर्डर्स एमएसएमई क्षेत्रातील उत्पादनांसाठी आल्या आहेत.
Happy to know that @GeM_India has achieved order value of Rs 1 Lakh Crore in a single year! This is a significant increase from previous years. The GeM platform is especially empowering MSMEs, with 57% of order value coming from MSME sector. pic.twitter.com/ylzSezZsjG
— Narendra Modi (@narendramodi) March 24, 2022