पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या सध्या सुरु असलेल्या लिलावाला (पीएम मोमेंटोज ऑक्शन) मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी सर्वांना, विशेषतः युवा वर्गाला आवाहन केले आहे की, त्यांनी लिलाव होत असलेल्या भेट वस्तू पहाव्यात आणि आपले कुटुंबीय आणि मित्रांना त्या भेट म्हणून द्याव्यात.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे:
“गेले काही दिवस, भेटवस्तूंच्या लिलावाला मिळत असलेल्या उत्फूर्त प्रतिसादाबद्दल मला समाधान वाटत आहे. पुस्तकांपासून ते कला कृतींपर्यंत, कप आणि मातीच्या वस्तूंपासून ते पितळेच्या उत्पादनांपर्यंत, गेल्या काही वर्षांत मला मिळालेल्या भेटवस्तूंची ही संपूर्ण श्रेणी या ठिकाणी लिलावासाठी उपलब्ध आहे. pmmementos.gov.in/#/“
“या लिलावाद्वारे मिळालेली रक्कम नमामि गंगे उपक्रमाला दिली जाईल. मी आपल्या सर्वांना, विशेषतः युवा वर्गाला आवाहन करतो, की त्यांनी लिलाव होत असलेल्या भेट वस्तू पहाव्यात आणि आपले कुटुंबीय आणि मित्रांना त्या भेट म्हणून द्याव्यात!”
I am delighted by the enthusiasm towards the PM Mementoes auction over the last few days. From books to art works, cups and ceramics to brass products, it is a whole range of gifts I have received over the years that are up for auction. https://t.co/3rph9cWlxT pic.twitter.com/liFqLj7EQp
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2022