पीएम मत्स्य संपदा योजनेचे लाभ समोर आणण्यासाठी सिरसा इथल्या शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. हे प्रयत्न महिला सक्षमीकरणाचेही प्रतीक आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
सिरसा इथल्या खासदार सुनीता दुग्गल यांनी, स्थानिक शेतकऱ्यांनी पीएमएमएसआय योजनेचे लाभ घेतल्याबद्दलचा एक ट्वीट थ्रेड केला आहे, त्याला पंतप्रधानांनी प्रतिसाद दिला.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“सिरसा इथल्या आमच्या शेतकरी बंधू-भगिनींचे हे प्रयत्न, पीएम मत्स्य संपदा योजनेचे लाभ तर समोर आणतातच, दुसरीकडे ते महिला सक्षमीकरणाचेही प्रतीक ठरले आहे.”
सिरसा में हमारे किसान भाई-बहनों का यह प्रयास जहां पीएम मत्स्य संपदा योजना के फायदों को सामने लाता है, वहीं यह महिला सशक्तिकरण का भी एक प्रतीक है। https://t.co/suPkEjpZvg
— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2023