अमृत सरोवर अभियानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. देशभरात ज्या वेगाने अमृत सरोवर बांधले जात आहेत यामुळे अमृत काळातील आपल्या संकल्पांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
40 हजारांहून अधिक अमृत सरोवर राष्ट्राला समर्पित करण्यात आले आहेत,अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत 50 हजार अमृत सरोवर बांधण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"खूप खूप अभिनंदन ! देशभरात ज्या वेगाने अमृत सरोवर बांधले जात आहेत त्यामुळे अमृत काळातील आपल्या संकल्पांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होणार आहे."
बहुत-बहुत बधाई! जिस तेजी से देशभर में अमृत सरोवरों का निर्माण हो रहा है, वो अमृतकाल के हमारे संकल्पों में नई ऊर्जा भरने वाली है। https://t.co/fdox1ia77m
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2023