केवळ 4 वर्षात नळजोडणीची संख्या 3 कोटींवरून 13 कोटींवर पोहोचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान म्हणाले की, जल जीवन मिशन लोकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आणि जीवन सुखकर करण्यात तसेच आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यात मैलाचा दगड ठरत आहे.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खूप-खूप अभिनंदन ! ग्रामीण भारतातील माझ्या कुटुंबीयांपर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचावे या दिशेने 'जल जीवन मिशन' मैलाचा दगड ठरत आहे. यामुळे त्यांचा त्रास दूर होण्यासाठी मदत होत असून त्याबरोबरच त्यांचे उत्तम आरोग्य देखील सुनिश्चित होत आहे."
इस शानदार उपलब्धि के लिए बहुत-बहुत बधाई! ग्रामीण भारत के मेरे परिवारजनों तक पीने का शुद्ध पानी पहुंचे, इस दिशा में ‘जल जीवन मिशन’ मील का पत्थर साबित होने जा रहा है। यह ना सिर्फ उनकी परेशानियों को दूर करने में मददगार बना है, बल्कि उनके बेहतर स्वास्थ्य को भी सुनिश्चित कर रहा है। https://t.co/0yU6Y2feb9
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2023