पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये पुरामुळे जीव गमावलेल्यांच्या वारसाला 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. तर जखमींना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा त्यांनी केली.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, "पश्चिम बंगालच्या काही भागात पुरामुळे जीव गमावलेल्यांच्या वारसाला पीएमएनआरएफकडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात येईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील."
An ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives due to flooding in parts of West Bengal. The injured would be given Rs. 50,000.
— PMO India (@PMOIndia) August 4, 2021