त्रिपुरा राज्यात कुमारघाट येथे उलट रथ यात्रेदरम्यान घडलेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी, पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी (PMNRF) मधून सहाय्य जाहीर केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाद्वारे केलेल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“कुमारघाट येथील उलट रथयात्रेदरम्यान झालेली दुर्घटना अत्यंत दुःखदायक आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी शोक व्यक्त करत आहे. जखमी लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे:पंतप्रधान @narendramodi”
"त्रिपुरातील दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून कडून 2 लाख रुपये तसेच जखमींना 50 हजारांची मदत दिली जाईल: पंतप्रधान @narendramodi”
The mishap during the Ulta Rath Yatra at Kumarghat is saddening. Condolences to those who have lost their loved ones in this mishap. May the injured recover soon. The local administration is providing all possible assistance to those affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 28, 2023