पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात नाशिक येथे झालेल्या बस दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची सानुग्रह अनुदानाची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे :
"नाशिक येथील बस दुर्घटनेने अतिशय दुःख झाले आहे. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे: PM @narendramodi"
"नाशिक येथे बसला आग लागल्याने झालेल्या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान दिले जाईल."
Anguished by the bus tragedy in Nashik. My thoughts are with those who have lost their loved ones in this mishap. May the injured recover at the earliest. The local administration is providing all possible assistance to those affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 8, 2022