जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांची भेट झाली.
पंतप्रधान त्रुडो यांनी भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या यशाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले.
भारत-कॅनडा परस्परसंबंध हे सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याच्या नियमांप्रति आदर आणि दोन्ही देशांमधील जनतेतील मजबूत संबंध यावर आधारित आहेत हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. कॅनडातील अतिरेकी घटकांकडून भारतविरोधी कारवाया सुरू असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. ते अलिप्ततावादाला प्रोत्साहन देत आहेत आणि भारतीय मुत्सद्द्यांविरुद्ध हिंसाचार भडकवत आहेत, दुतावासांच्या परिसराचे नुकसान करत आहेत. तसेच कॅनडातील भारतीय समुदायाला आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांना धोका पोहचवत आहेत. संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा व्यापार आणि मानवी तस्करीशी अशा शक्तींचे लागेबांधे हा कॅनडासाठी देखील चिंतेचा विषय आहे. अशा धोक्यांना तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
भारत-कॅनडा संबंधांच्या प्रगतीसाठी परस्परांप्रति आदर आणि विश्वासावर आधारित संबंध आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
Met PM @JustinTrudeau on the sidelines of the G20 Summit. We discussed the full range of India-Canada ties across different sectors. pic.twitter.com/iP9fsILWac
— Narendra Modi (@narendramodi) September 10, 2023