पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी संयुक्तपणे भारत-बांगलादेश मैत्री तेल ऊर्जावाहिनीचे केले उद्घाटन
भारत-बांगलादेश मैत्री तेल ऊर्जावाहिनी ही भारत आणि त्याच्या शेजारी देशांमधील दुसरी सीमापार तेल ऊर्जावाहिनी
बांगलादेशसोबत वाढलेल्या संपर्क सुविधांमुळे उभय देशांमधील लोकांचे परस्पर संबंध अधिक दृढ होतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज संयुक्तपणे भारत-बांगलादेश मैत्री तेल ऊर्जावाहिनीचे  (आयबीएफपी) आभासी माध्यमातून उद्घाटन केले.या तेल ऊर्जावाहिनी बांधकामाची पायाभरणी सप्टेंबर 2018 मध्ये दोन्ही पंतप्रधानांनी केली होती. 2015 पासून  नुमालीगढ रिफायनरी लिमिटेड बांगलादेशला पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा करत आहे. भारत आणि त्याच्या शेजारी देशांमधील ही दुसरी  सीमापार  तेल ऊर्जा वाहिनी  आहे.

वीज आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य हे भारत-बांगलादेश संबंधांचे एक वैशिष्ट्य बनले आहे. भारत-बांगलादेश मैत्री तेलऊर्जावाहिनी ही भारत आणि बांगलादेश दरम्यानची पहिली सीमापार तेल ऊर्जावाहिनी असून  वार्षिक 1 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटीपीए) हाय-स्पीड डिझेल (एचएसडी) बांगलादेशला नेण्याची तिची क्षमता आहे. बांग्लादेशसोबत वाढलेल्या संपर्क सुविधा उभय देशांमधील लोकांचे परस्पर संबंध अधिक दृढ  करेल.

बांगलादेश हा भारताचा सर्वोच्च  विकास भागीदार आहे आणि या प्रदेशातील सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे.मैत्री ऊर्जावाहिनी कार्यान्वित झाल्यामुळे दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य वाढेल आणि बांगलादेशमध्ये, विशेषतः कृषी क्षेत्रात आणखी वृद्धी होईल.

या प्रकल्पास सतत मार्गदर्शन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान  शेख हसीना यांचे आभार मानले आणि उभय देशांमधील लोकांच्या हितासाठी त्यांच्यासोबत कार्यरत  राहण्याची इच्छा व्यक्त केली.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi congratulates hockey team for winning Women's Asian Champions Trophy
November 21, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi today congratulated the Indian Hockey team on winning the Women's Asian Champions Trophy.

Shri Modi said that their win will motivate upcoming athletes.

The Prime Minister posted on X:

"A phenomenal accomplishment!

Congratulations to our hockey team on winning the Women's Asian Champions Trophy. They played exceptionally well through the tournament. Their success will motivate many upcoming athletes."