पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यानिमित्त एका टपाल तिकीटाचे देखील त्यांनी अनावरण केले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, देवुसिंह चौहान आणि एल मुरुगन आणि दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातील उद्योजक यावेळी उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की, आज देशाला समर्पित केलेला स्वदेशी बनावटीचा 5G टेस्ट बेड, दूरसंचार क्षेत्रातील महत्वपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानामध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आयआयटीसह या प्रकल्पाशी संबंधित सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. “5G च्या रूपात देशाचे स्वतःचे 5G मानक बनवले आहे, ही देशासाठी खूप अभिमानाची बाब आहे. देशातील खेड्यापाड्यात 5G तंत्रज्ञान पोहचवण्यात ते मोठी भूमिका बजावेल,” असे ते म्हणाले.
कनेक्टिव्हिटी 21 व्या शतकातील भारतातील प्रगतीचा वेग निश्चित करेल असे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे प्रत्येक स्तरावर कनेक्टिव्हिटीचे आधुनिकीकरण करावे लागणार आहे. 5G तंत्रज्ञान देशाच्या प्रशासनामध्ये, राहणीमानात आणि व्यवसाय सुलभतेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणार आहे, असे ते म्हणाले. यामुळे कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक यांसारख्या प्रत्येक क्षेत्रात विकासाला चालना मिळेल. यामुळे सुविधाही वाढतील आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. 5G च्या जलद अंमलबजावणीसाठी सरकार आणि उद्योग दोघांच्या प्रयत्नांची गरज आहे, असे ते म्हणाले.
आत्मनिर्भरता आणि निकोप स्पर्धा समाज आणि अर्थव्यवस्थेवर कसा गुणात्मक प्रभाव निर्माण करते याचे उत्तम उदाहरण म्हणून पंतप्रधानांनी दूरसंचार क्षेत्राचा उल्लेख केला. 2G युगातील निराशा, हताशा , भ्रष्टाचार आणि धोरण लकवा यातून बाहेर पडून देश वेगाने 3G वरून 4G आणि आता 5G आणि 6G च्या दिशेने वाटचाल करत आहे असे ते म्हणाले.
गेल्या 8 वर्षांत दूरसंचार क्षेत्रात पोहोच, सुधारणा, नियमन, प्रतिसाद आणि क्रांती या 'पंचामृता' ने नवीन ऊर्जेचा संचार केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावल्याचे श्रेय त्यांनी ट्रायला दिले. पंतप्रधान म्हणाले की, देश आता ‘संपूर्ण सरकारी दृष्टिकोन’ घेऊन पुढे जात आहे. आज आपण देशातील दूरध्वनी जोडण्या आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत जगात सर्वात वेगाने विस्तारत आहोत, दूरसंचारसह अनेक क्षेत्रांनी त्यात योगदान दिल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, गरीबातील गरीब कुटुंबांना मोबाईल उपलब्ध करून देण्यासाठी देशातच मोबाईल फोनच्या निर्मितीवर भर देण्यात आला आहे. याचा परिणाम असा झाला की मोबाईल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढून 2 वरून 200 पेक्षा अधिक झाली.
आज भारत देशातील प्रत्येक गाव ऑप्टिकल फायबरने जोडत आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की 2014 पूर्वी, भारतातील 100 ग्रामपंचायतींनाही ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी पुरवण्यात आली नव्हती. आज आम्ही सुमारे 1.75 लाख ग्रामपंचायतीपर्यंत ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पोहोचवली आहे. यामुळे शेकडो शासकीय सेवा गावागावात पोहोचत आहेत.
वर्तमान आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ट्रायसारख्या नियामकांसाठी देखील ‘संपूर्ण सरकारी दृष्टीकोन’ महत्त्वाचा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. “आज नियमन केवळ एका क्षेत्रापुरते मर्यादित नाही. तंत्रज्ञान विविध क्षेत्रांना एकमेकांशी जोडत आहे. म्हणूनच आज प्रत्येकाला सहकार्यात्मक नियमन करण्याची गरज भासत आहे. यासाठी सर्व नियामकांनी एकत्र येणे, सामायिक व्यासपीठ विकसित करणे आणि उत्तम समन्वयासाठी उपाय शोधणे आवश्यक आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
मुझे देश को अपना, खुद से निर्मित 5G Testbed राष्ट्र को समर्पित करने का अवसर मिला है।
— PMO India (@PMOIndia) May 17, 2022
ये टेलिकॉम सेक्टर में क्रिटिकल और आधुनिक टेक्नॉलॉजी की आत्मनिर्भरता की दिशा में भी एक अहम कदम है।
मैं इस प्रोजेक्ट से जुड़े सभी साथियों को, हमारे IITs को बहुत-बहुत बधाई देता हूं: PM
5Gi के रूप में जो देश का अपना 5G standard बनाया गया है, वो देश के लिए बहुत गर्व की बात है।
— PMO India (@PMOIndia) May 17, 2022
ये देश के गांवों में 5G टेक्नॉलॉजी पहुंचाने में बड़ी भूमिका निभाएगा: PM @narendramodi
21वीं सदी के भारत में कनेक्टिविटी, देश की प्रगति की गति को निर्धारित करेगी।
— PMO India (@PMOIndia) May 17, 2022
इसलिए हर स्तर पर कनेक्टिविटी को आधुनिक बनाना ही होगा: PM @narendramodi
5G टेक्नोलॉजी भी देश की गवर्नेंस में, ease of living, ease of doing business में सकारात्मक बदलाव लाने वाली है।
— PMO India (@PMOIndia) May 17, 2022
इससे खेती, स्वास्थ्य, शिक्षा, इंफ्रास्ट्रक्चर और logistics, हर सेक्टर में ग्रोथ को बल मिलेगा।
इससे सुविधा भी बढ़ेगी और रोज़गार के भी अनेक अवसर बनेंगे: PM @narendramodi
आत्मनिर्भरता और स्वस्थ स्पर्धा कैसे समाज में, अर्थव्यवस्था में multiplier effect पैदा करती है, इसका एक बेहतरीन उदाहरण हमारा टेलिकॉम सेक्टर है।
— PMO India (@PMOIndia) May 17, 2022
2G काल की निराशा, हताशा, करप्शन, पॉलिसी पैरालिसिस से बाहर निकलकर देश ने 3G से 4G और अब 5G और 6G की तरफ तेज़ी से कदम बढ़ाए हैं: PM
Silos वाली सोच से आगे निकलकर अब देश whole of the government approach के साथ आगे बढ़ रहा है।
— PMO India (@PMOIndia) May 17, 2022
आज हम देश में tele-density और internet users के मामले में दुनिया में सबसे तेज़ी से expand हो रहे हैं तो उसमें टेलीकॉम समेत कई सेक्टर्स की भूमिका रही है: PM @narendramodi
मोबाइल गरीब से गरीब परिवार की भी पहुंच में हो, इसके लिए हमने देश में ही मोबाइल फोन की मैन्युफेक्चरिंग पर बल दिया।
— PMO India (@PMOIndia) May 17, 2022
परिणाम ये हुआ कि मोबाइल मैन्युफेक्चरिंग यूनिट्स 2 से बढ़कर 200 से अधिक हो गईं: PM @narendramodi
आज भारत देश के हर गांव तक ऑप्टिकल फाइबर से जोड़ने में जुटा है।
— PMO India (@PMOIndia) May 17, 2022
आपको भी पता है कि 2014 से पहले भारत में 100 ग्राम पंचायतें भी ऑप्टिकल फाइबर कनेक्टिविटी से नहीं जुड़ी थीं।
आज हम करीब-करीब पौने दो लाख ग्राम पंचायतों तक ब्रॉडबैंड कनेक्टिविटी पहुंचा चुके हैं: PM @narendramodi