“लचित बडफूकनचे आयुष्य, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रशक्तीसाठी प्रेरणादायक”
“दुहेरी इंजिनाचे सरकार सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या भावनेने कार्यरत”
“अमृत सरोवर प्रकल्प हा पूर्णपणे लोकसहभागावर आधारित”
“2014 पासून ईशान्य भारतातील अडचणी कमी होत असून विकासाची गती वाढते आहे.”
“बोडो करार 2020 ने इथे स्थायी शांततेसाठीची दारे केली मोकळी
“गेल्या आठ वर्षात, ईशान्य भारतातील शांतता आणि उत्तम कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीमुळे आम्ही अनेक भागातून आफस्पा कायदा रद्द केला आहे.
“आसाम आणि मेघालय यांच्यातील करारामुळे इतर प्रश्न सुटण्यासही मदत होईल. यामुळे संपूर्ण प्रदेशातील विकासाच्या आकांक्षा पूर्ण करण्यास गती मिळेल.”
“आधीच्या दशकांमध्ये न झालेल्या विकासाची पोकळी आता आपल्याला भरुन काढायची आहे”

आसामच्या कार्बी आंगलोंग जिल्हयात दीफू इथे ‘शांतता, एकता आणि विकासाच्या’ यात्रेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं.या कार्यक्रमात, त्यांनी विविध प्रकल्पांची पायाभरणी देखील केली. यामध्‍ये  , दीफू इथले पशुवैद्यकीय महाविद्यालय, पश्चिम कार्बी आंगलोंग इथले पदवी महाविद्यालय आणि पश्चिम कार्बी आंगलोंग इथले कृषी महाविद्यालय, अशा प्रकल्पांच समावेश आहे. 500 कोटींपेक्षा अधिक किमतीचे असलेले हे प्रकल्प, या प्रदेशात कौशल्य आणि विकासाच्या नव्या संधी आणतील. त्याशिवाय, पंतप्रधानांनी 2950 अमृत सरोवर प्रकल्पांचेही भूमीपूजन केले. एकूण 1150 कोटी रुपये खर्च करुन आसाम सरकार ही अमृत सरोवरे विकसित करणार आहे. आसामचे राज्यपाल जगदीश मुखी आणि मुख्यमंत्री हिमांता बिस्व सरमा देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधानांनी कार्बी आंगलोंगच्या लोकांनी केलेल्या हृद्य स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले. सध्या देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असतांनाच, आसामचे महान पुत्र लचित बडफुकन यांची 400 वी जयंती हा सुखद योगायोग असल्याचे त्यांनी नमूद केले. “ लचित बडफुकन यांचे आयुष्य, देशभक्ती आणि राष्ट्र शक्तीसाठी प्रेरणादायक आहे. कार्बी आंगलोंगच्या या महान सुपुत्राला माझे वंदन” असे पंतप्रधान म्हणाले.

केंद्र आणि राज्यातील दुहेरी इंजिनाचे सरकार, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास आणि सबका विश्वास, या मंत्रानुसार काम करत आहे. “ आज कार्बी आंगलोंगच्या या भूमीवर आमचा हा लोकसेवेचा संकल्प अधिकच दृढ होत आहे. आसाममध्ये शांतता नांदावी आणि आसामचा विकास झपाट्याने व्हावा, यासाठी करण्यात आलेल्या कराराची अंमलबजावणी वेगाने होत आहे.” असे त्यांनी सांगितले.

आज इथे 2600 पेक्षा अधिक अमृत सरोवरे विकसित करण्याचे कामही सुरु होत असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प संपूर्णपणे लोकसहभागावर अवलंबून असल्यावर त्यांनी भर दिला. आदिवासी परंपरेत अशा सरोवरांची समृद्ध परंपरा आहे, असेही ते म्हणाले. आता हे तलाव, इथल्या गावकऱ्यांसाठी केवळ जलसाठयाचे साधन असणार नाहीत, तर त्यातून त्यांना रोजगारनिर्मितीही होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की 2014 पासून ईशान्य भारत प्रदेशातील अडचणी कमी झाल्या असून, विकासाची कामे वाढली आहेत. “आज जेव्हा कोणी आसामच्या आदिवासी भागात जातो, तेव्हा त्याला देखील तिथल्या परिस्थितीत होत असलेला बदल बघून समाधान वाटते.”असे ते म्हणाले. कार्बी आंगलोंगच्याच्या अनेक  संघटनांनी शांतता आणि विकासाच्या प्रक्रियेत सहभाग घेतला आहे, यचे त्यांनी स्मरण केले. 2020 मध्ये झालेल्या बोडो करारामुळेही कायमस्वरूपी शांततेचे मार्ग खुले केले आहेत.त्याचप्रमाणे, त्रिपुरा इथेही, एनआयएफटी ने शांततेसाठी अनेक पावले उचलली आहेत. गेली अडीच दशके प्रलंबित असलेलं, ब्रू-रेयांगचा प्रश्न देखील सुटला आहे, असेही त्यांनी सांगितले. ईशान्य भारतातील काही राज्यांत, गेल्या कित्येक वर्षांपासूनसशस्त्र दल विशेषधिकार कायदा, ईशान्य भारत कायदा (AFSPA) इथे लागू होता.  “मात्र, गेल्या आठ वर्षात, आम्ही ईशान्य भारतात, जिथे कायमस्वरूपी शांतता आणि  उत्तम कायदा सुव्यवस्था प्रस्थापित झाली आहे, अशा अनेक भागातला (AFSPA) कायदा काढून टाकला आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. सबका साथ, सबका विकास या सूत्रातून, सीमाप्रश्नांवर देखील तोडगा शोधला जात आहे. “ आसाम आणि मेघालय यांच्यातील कारारामुळे देखील असे प्रश्न  सुटण्यास मदत होईल, आणि यामुळे या भागातल्या लोकांच्या इच्छा आंकक्षा पूर्ण होण्यास बळ मिळेल” अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली.

आदिवासी समुदायांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, “आदिवासी समाजाची संस्कृती, त्यांची  भाषा, खाद्यपदार्थ, कला, हस्तकला, हे सर्व भारताचा समृद्ध वारसा आहेत. आसाम याबाबतीत अधिक समृद्ध आहे. हा सांस्कृतिक वारसा भारताला जोडतो, एक भारत श्रेष्ठ भारत ही  भावना बळकट करतो.

स्वातंत्र्याच्या अमृत कालावधीत कार्बी आंगलॉंग देखील शांतता आणि विकासाच्या दृष्टीने नव्या भविष्याकडे वाटचाल करत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.  आता इथून पुढे आपल्याला मागे वळून पाहायचे नाही .येत्या काही वर्षांत, आपल्याला एकत्रितपणे विकासाची भरपाई करायची आहे. असा आपण पूर्वीच्या दशकात साध्य करू शकलो नाही. सेवा आणि समर्पणाच्या भावनेने केंद्राच्या योजना राबवल्याबद्दल पंतप्रधानांनी आसाम आणि या प्रदेशातील इतर राज्य सरकारांचे कौतुक केले. इतक्या  मोठ्या संख्येने बाहेर पडल्याबद्दल त्यांनी महिलांचे आभार मानले आणि सरकारच्या सर्व उपाययोजनांच्या माध्यमातून महिलांच्या स्थितीच्या उन्नतीसाठी, त्यांचे सुकर जीवन जगण्यासाठी  आणि महिलांच्या प्रतिष्ठेसाठी  सतत लक्ष केंद्रित करत असल्याचा  पुनरुच्चार त्यांनी केला.

या प्रदेशाच्या निरंतर विकासासाठी स्वत:ला झोकून देत आसामच्या जनतेला त्यांच्या प्रेमाची आणि आपुलकीची परतफेड व्याजासह करीन असे  आश्वासन देऊन पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.

सहा कार्बी दहशतवादी  संघटनांसह भारत सरकार आणि आसाम सरकारने अलीकडेच सामंजस्य करारावर  केलेली स्वाक्षरी हे या प्रदेशाची शांतता आणि विकासासाठी पंतप्रधानांच्या अतूट वचनबद्धतेचे उदाहरण आहे. या  कराराने  या प्रदेशात शांततेच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi