पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून श्री श्री हरिश्चंद्र ठाकूर जी यांच्या 211 व्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमधील श्रीधाम ठाकूरनगर, ठाकूरबारी, येथे आयोजित मतुआ धर्म महामेळावा 2022 ला संबोधित केले.
मार्च 2021 मध्ये बांगलादेशातील ओरकंडी ठाकूरबारी येथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करता आल्याबद्दल त्याचप्रमाणे फेब्रुवारी 2019 मध्ये ठाकूरनगरला भेट देण्याची संधी मिळाल्याबद्दल झालेल्या आनंदाचे पंतप्रधानांनी स्मरण केले.
ज्याचा पाया श्री श्री हरिचंद ठाकूर जी यांनी रचला आणि पुढे गुरुचंद ठाकूर जी आणि बोरो मा यांनी जोपासलेल्या मतुआ परंपरेला अभिवादन करण्याचे मतुआ धर्म महामेळावा हे निमित्त आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. ही महान परंपरा पुढे नेण्याचे श्रेय पंतप्रधानांनी त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी शांतनू ठाकूर यांनाही दिले.
हा महामेळावा एक भारत श्रेष्ठ भारताचे प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधान म्हणाले. अखंड प्रवाह आणि सातत्यामुळे आपली संस्कृती आणि सभ्यता महान आहे आणि स्वतःला सक्षम करण्याची तिची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. मतुआ समाजातील नेत्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत, देशातील मुलींना स्वच्छता, आरोग्य आणि आत्मविश्वास प्रदान करण्याच्या नव्या भारताच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधानांनी नमूद केले. "जेंव्हा आपण समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या भगिनी आणि मुलींना मुलांसह राष्ट्र उभारणीत योगदान देताना पाहतो, तेंव्हा श्री श्री हरिचंद ठाकूरजींसारख्या महान व्यक्तिमत्त्वांना खरी श्रद्धांजली ठरते ", असे पंतप्रधान म्हणाले.
"जेंव्हा सरकार सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या तत्त्वावर सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवते आणि जेंव्हा, सबका प्रयास हे तत्व देशाच्या विकासाला चालना देते, तेंव्हा आपण सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करतो" असे पंतप्रधानांनी सांगितले. श्री श्री हरिश्चंद्र ठाकूरजींनी दैवी प्रेमासोबत कर्तव्यावर दिलेला भर याचे स्मरण करून, पंतप्रधानांनी नागरी जीवनातील कर्तव्य बजावण्याच्या भूमिकेवर जोर दिला. “आपल्याला कर्तव्याच्या जाणीवेला देशाच्या विकासाचा आधार बनवायचे आहे. आपल्या संविधानाने आपल्याला अनेक अधिकार दिले आहेत. जेंव्हा आपण आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडू तेंव्हाच आपण त्या अधिकारांचे संरक्षण करू शकतो,” असे पंतप्रधान म्हणाले.
समाजातील प्रत्येक स्तरावरील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी जागृती करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी मतुआ समाजाला केले. “कुठेही कोणाचाही छळ होत असेल तर तिथे नक्कीच आवाज उठवा. हे समाजाप्रती आणि देशाप्रतीही आपले कर्तव्य आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. “राजकीय घडामोडींमध्ये सहभागी होणे हा आपला लोकशाही अधिकार आहे. मात्र राजकीय विरोधामुळे कोणी हिंसाचाराने कुणाला धाक दाखवत असेल, तर ते इतरांच्या हक्कांचे उल्लंघन आहे, त्यामुळे समाजात कुठेही हिंसाचार, अराजकतेची मानसिकता असेल, तर त्याला विरोध करणे हे आपले कर्तव्य आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
स्वच्छता, व्होकल फॉर लोकल आणि देश प्रथम - या आवाहनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
ये मतुआ धर्मियो महामेला, मतुआ परंपरा को नमन करने का अवसर है।
— PMO India (@PMOIndia) March 29, 2022
ये उन मूल्यों के प्रति आस्था व्यक्त करने का अवसर है जिनकी नींव श्री श्री हरिचांद ठाकुर जी ने रखी थी।
इसे गुरुचांद ठाकुर जी और बोरो मां ने सशक्त किया।
आज शांतनु जी के सहयोग से ये परंपरा इस समय और समृद्ध हो रही है: PM
हम अक्सर कहते हैं कि हमारी संस्कृति, हमारी सभ्यता महान है।
— PMO India (@PMOIndia) March 29, 2022
ये महान इसलिए है क्योंकि इसमें निरंतरता है,
ये प्रवाहमान है,
इसमें खुद को सशक्त करने की एक स्वाभाविक प्रवृत्ति है: PM @narendramodi
जब समाज के हर क्षेत्र में हमारी बहनों-बेटियों को बेटों के साथ कंधे से कंधा मिलाकर राष्ट्रनिर्माण में योगदान देते देखता है,
— PMO India (@PMOIndia) March 29, 2022
तब लगता है कि हम सही मायने में श्री श्री हॉरिचांद ठाकुर जी जैसी महान विभूतियों का सम्मान कर रहे हैं: PM @narendramodi
जब सरकार सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास के आधार पर सरकारी योजनाओं को जन-जन तक पहुंचाती है,
— PMO India (@PMOIndia) March 29, 2022
जब सबका प्रयास, राष्ट्र के विकास की शक्ति बनता है,
तब हम सर्वसमावेशी समाज के निर्माण की तरफ बढ़ते हैं: PM @narendramodi
श्री श्री हॉरिचॉन्द ठाकुर जी ने एक और संदेश दिया है जो आज़ादी के अमृतकाल में भारत के हर भारतवासी के लिए प्रेरणा का स्रोत है।
— PMO India (@PMOIndia) March 29, 2022
उन्होंने ईश्वरीय प्रेम के साथ-साथ हमारे कर्तव्यों का भी हमें बोध कराया: PM @narendramodi
कर्तव्यों की इसी भावना को हमें राष्ट्र के विकास का भी आधार बनाना है।
— PMO India (@PMOIndia) March 29, 2022
हमारा संविधान हमें बहुत सारे अधिकार देता है।
उन अधिकारों को हम तभी सुरक्षित रख सकते हैं, जब हम अपने कर्तव्यों को ईमानदारी से निभाएंगे: PM @narendramodi
आज मैं मतुआ समाज के सभी साथियों से भी कुछ आग्रह करना चाहूंगा।
— PMO India (@PMOIndia) March 29, 2022
सिस्टम से करप्शन को मिटाने के लिए समाज के स्तर पर आपको जागरूकता को और बढ़ाना है।
अगर कहीं भी किसी का उत्पीड़न हो रहा हो, तो वहां ज़रूर आवाज़ उठाएं।
ये हमारा समाज के प्रति भी और राष्ट्र के प्रति भी कर्तव्य है: PM
राजनीतिक गतिविधियों में हिस्सा लेना हमारा लोकतांत्रिक अधिकार है।
— PMO India (@PMOIndia) March 29, 2022
लेकिन राजनीतिक विरोध के कारण अगर किसी को हिंसा से डरा-धमकाकर कोई रोकता है तो वो दूसरे के अधिकारों का हनन है।
इसलिए ये हमारा कर्तव्य है कि हिंसा,अराजकता की मानसिकता अगर समाज में कहीं भी है तो उसका विरोध किया जाए:PM