Quote"भारत आता 'संभाव्यता आणि क्षमतांच्या' पलीकडे जात आहे आणि जागतिक कल्याणाचा एक मोठा उद्देश पार पाडत आहे"
Quote“देश आज प्रतिभा, व्यापार आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे”
Quote"आत्मनिर्भर भारत हा आमचा मार्ग आणि संकल्प आहे"
Quote"पृथ्वी - पर्यावरण, कृषी, पुनर्प्रक्रीया, तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा” यासाठी कार्य करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या 'जीतो कनेक्ट 2022' च्या उद्घाटन सत्राला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.

आजच्या कार्यक्रमाच्या संकल्पनेत ‘सबका प्रयास’ ही भावना असल्याकडे  या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी लक्ष वेधले. जग आज भारताच्या विकास संकल्पांना आपली उद्दिष्टे साध्य करण्याचे साधन मानत असल्याचेही त्यांनी सांगितले.  जागतिक शांतता असो, जागतिक समृद्धी असो, जागतिक आव्हानांशी संबंधित उपाय असो किंवा जागतिक पुरवठा साखळी मजबूत करणे असो, जग भारताकडे मोठ्या विश्वासाने पाहत आहे.  “अमृत काल’ साठी भारताच्या संकल्पांबाबत अनेक युरोपीय देशांना माहिती देऊन मी नुकताच परत आलो आहे.” असे ते पुढे म्हणाले.

|

कौशल्याचे क्षेत्र असो की इतर महत्वाचे क्षेत्र, लोकांचे कोणतेही मतभेद असोत, ते सर्व नवीन भारताच्या उदयाने एकत्र आले आहेत असे पंतप्रधान म्हणाले.  आज प्रत्येकाला वाटते की भारत आता ‘संभाव्यता आणि क्षमतांच्या’ पलीकडे जात आहे आणि जागतिक कल्याणाचा एक मोठा उद्देश पूर्ण करत आहे.  स्वच्छ हेतू, स्पष्ट हेतू आणि अनुकूल धोरणांच्या आपल्या पूर्वीच्या प्रतिपादनाचा पुनरुच्चार करून ते म्हणाले की, आज देश प्रतिभा, व्यापार आणि तंत्रज्ञानाला शक्य तितके प्रोत्साहन देत आहे.  आज देश दररोज डझनावारी स्टार्टअप्सची नोंदणी करत आहे, दर आठवड्याला एक युनिकॉर्न तयार करत आहे, असे ते म्हणाले.

सरकारी ई-बाजारपेठ म्हणजेच GeM पोर्टल अस्तित्वात आले आहे, तेव्हापासून सर्व खरेदी सर्वांसमोर एकाच मंचावर केली जाते असे पंतप्रधान म्हणाले. आता दुर्गम खेड्यातील लोक, छोटे दुकानदार आणि बचत गट त्यांची उत्पादने थेट सरकारला विकू शकतात.  40 लाखांहून अधिक विक्रेते सध्या GeM पोर्टलवर सहभागी झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.  पारदर्शक ‘फेसलेस’ कर मूल्यांकन, एक राष्ट्र-एक कर, उत्पादकतेशी सलग्न प्रोत्साहन योजनांबद्दलही त्यांनी सांगितले.

भविष्यासाठी आमचा मार्ग आणि ध्येय स्पष्ट आहे.  “आत्मनिर्भर भारत हा आपला मार्ग आणि संकल्प आहे.  गेल्या काही वर्षांत, आम्ही यासाठी आवश्यक असलेले सर्व वातावरण तयार करण्यासाठी सातत्याने काम केले आहे” असे पंतप्रधान म्हणाले.

|

आपल्या वसुंधरेसाठी काम करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी उपस्थितांना केले.  ‘ई’ म्हणजे पर्यावरणाची समृद्धी, असे त्यांनी स्पष्ट केले.  पुढील वर्षी 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 अमृत सरोवर बनवण्याच्या प्रयत्नांना ते कशी साथ देऊ शकतात यावरही चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

‘ए’ म्हणजे शेती अधिक फायदेशीर बनवणे आणि नैसर्गिक शेती, शेती तंत्रज्ञान आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करणे.  'आर' म्हणजे पुनर्वापर आणि चक्रीय अर्थव्यवस्थेवर भर देणे, पुनर्वापर, वापर कमी करणे आणि पुनर्वापरासाठी काम करणे. 

‘टी’ म्हणजे तंत्रज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे.  ड्रोन तंत्रज्ञानासारखे इतर प्रगत तंत्रज्ञान अधिक सुलभ कसे करता येईल, याचा विचार उपस्थितांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.

‘एच’ म्हणजे आरोग्यसेवा, आज सरकार देशातील प्रत्येक जिल्ह्यात आरोग्यसेवा, वैद्यकीय महाविद्यालये अशा व्यवस्थेसाठी खूप काम करत आहे.  आपली संस्था याला कशाप्रकारे प्रोत्साहन देऊ शकते याचा विचार उपस्थितांनी करावा असे त्यांनी सांगितले.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Over 28 lakh companies registered in India: Govt data

Media Coverage

Over 28 lakh companies registered in India: Govt data
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 फेब्रुवारी 2025
February 19, 2025

Appreciation for PM Modi's Efforts in Strengthening Economic Ties with Qatar and Beyond