Quoteआपल्या सशस्त्र दलांना अधिक बळकट करण्यात आणि त्यांना भविष्यासाठी सज्ज करण्यात ही परिवर्तनकारी योजना परिणामकारक ठरेल, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
Quoteआपल्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
Quoteनव्यानं उदयाला येत असलेल्या संपर्करहित युद्धपद्धतींमधील आव्हानांबद्दल चर्चा करताना पंतप्रधान म्हणाले की तांत्रिकदृष्ट्या प्रगत सैनिक आपल्या सशस्त्र दलांमध्ये महत्वाची भूमिका बजावतील.
Quoteपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिन्ही दलातील प्राथमिक प्रशिक्षण सुरु करणाऱ्या अग्नीवीरांच्या पहिल्या तुकडीला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.
Quoteअग्नीवीरांच्या क्षमतेबद्दल दृढ विश्वास व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले की त्यांच्यातील ऊर्जा सशस्त्र दलांच्या शौर्याचे प्रतिबिंब आहे ज्याने राष्ट्राचा ध्वज नेहमीच उंच फडकत ठेवला आहे.
Quoteआपल्या वर्तमान पिढीतील युवावर्गाकडे तशी क्षमता आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळात आपले अग्नीवर सशस्त्र दलांमध्ये प्रमुख भूमिका बजावतील, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिन्ही दलातील प्राथमिक प्रशिक्षण सुरु करणाऱ्या अग्नीवीरांच्या पहिल्या तुकडीला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.

या पथदर्शी अग्निपथ योजनेचे बिनीचे शिलेदार झाल्याबद्दल पंतप्रधानांनी अग्निवीरांचे अभिनंदन केले. आपल्या सशस्त्र दलांना अधिक बळकट करण्यात  आणि त्यांना भविष्यासाठी सज्ज करण्यात ही  परिवर्तनकारी योजना परिणामकारक ठरेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या युवा अग्नीवीरांमुळे भारताचे सशस्त्र दल अधिक उत्साहपूर्ण आणि तंत्रज्ञान स्नेही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अग्नीवीरांच्या क्षमतेबद्दल दृढ  विश्वास व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले की त्यांच्यातील ऊर्जा सशस्त्र दलांच्या शौर्याचे प्रतिबिंब आहे ज्याने राष्ट्राचा ध्वज नेहमीच उंच फडकत ठेवला आहे.

नवा भारत नव्या जोमाने भरलेला असून आपल्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.  21 व्या शतकात युद्धाच्या स्वरूपात बदल होत आहेत, असे सांगून नव्याने  उदयाला येत असलेल्या संपर्करहित युद्धपद्धतींमधील आणि सायबर युद्धामधील आव्हानांबद्दल चर्चा करताना पंतप्रधान म्हणाले की  तांत्रिकदृष्ट्या प्रगत  सैनिक आपल्या  सशस्त्र दलांमध्ये महत्वाची भूमिका बजावतील. आपल्या वर्तमान पिढीतील युवावर्गाकडे तशी क्षमता आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळात आपले अग्नीवर सशस्त्र  दलांमध्ये  प्रमुख भूमिका बजावतील, असे ते म्हणाले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी  अग्नीपथ योजना कशा प्रकारे लाभदायक आहे, याविषयी  पंतप्रधानांनी चर्चा केली.  महिला अग्नीवीर आपल्या कामगिरीने ज्या प्रकारे नौदलाची शान वाढवत आहेत, त्याबद्दल  त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच आपण तिन्ही दलांमध्ये महिला अग्नीवीरांना पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. सियाचीनमध्ये तैनात असलेल्या महिला सैनिक आणि आधुनिक लढाऊ विमाने चालवणाऱ्या महिलांची उदाहरणे देत पंतप्रधानांनी विविध आघाड्यांवर महिला सशस्त्र दलांनी कशाप्रकारे  नेतृत्व केले आहे याची आठवण करून दिली.

विविध भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तैनात झाल्यानंतर अग्नीवीरांना समृद्ध अनुभवांची शिदोरी तर मिळेलच शिवाय त्यांना या संधीचा लाभ त्या प्रदेशातील भाषा शिकून घेण्यात आणि तेथील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि जीवनशैली जाणून घेण्यात होईल, असे त्यांनी सांगितले. सांघिक कार्य आणि नेतृत्व कौशल्याचा सन्मान यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम मिळेल, असे ते म्हणाले. अग्निवीरांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातले त्यांचे नैपुण्य अधिक वाढवण्यासाठी कार्य करत असताना नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक राहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधानांनी युवक आणि अग्निवीरांच्या क्षमतेचे कौतुक केले आणि   21 व्या शतकात तेच राष्ट्राचे  नेतृत्व करणार आहेत, असे सांगून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

  • Suryakant Amaranth Pandey February 01, 2023

    Jay Jay Shri Ram
  • Suryakant Amaranth Pandey January 28, 2023

    Har Har Modi ghar ghar modi
  • Suryakant Amaranth Pandey January 28, 2023

    Jay Jay shree Ram
  • Suryakant Amaranth Pandey January 27, 2023

    हर हर मोदी घर घर मोदी मोदी है तो मुमकिन है
  • Suryakant Amaranth Pandey January 27, 2023

    बेस्ट नेशनल कबड्डी खिलाड़ी गुजरात आनंद राहुल पांडे
  • January 26, 2023

    Hindustan jindabad jay hind
  • kheemanand pandey January 25, 2023

    अग्निपथ योजना📋 बहुप्रतीक्षित कौशल विकास का आधार जो युवाओं अभिभावकों को ही संबल व सहयोग नहीं देगी अपितु राष्ट्रीय समृद्धि में महत्वपूर्ण भूमिका अदा करने में सक्षम होगी उक्त भाव सूक्ष्म रूप में दूरदर्शी भावना से परिलक्षित होता है🙏
  • Sanjay Zala January 24, 2023

    👩‍✈️👩‍🎨 Asking In A Best Wishes Of A Over All In A _ 'WORLDWIDE' Cosponsored On A _ 'National' Girl Child Day. Believed In A _ Save Girl & Child Touch 02 A _ Education & Educated Onwards Of A. 👩‍🎨👩‍✈️
  • Mousumi Paul January 22, 2023

    Jai Hind Ki Senaa 🙏 🇮🇳
  • अनन्त राम मिश्र January 22, 2023

    जय हिंद जय भारत बंदेमातरम् जय हो बिजय हो
Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
UPI revolution: Surpasses Visa with 650 million daily transactions; 'leading the digital payment revolution, ' says Amitabh Kant

Media Coverage

UPI revolution: Surpasses Visa with 650 million daily transactions; 'leading the digital payment revolution, ' says Amitabh Kant
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles the loss of lives due to a road accident in Pithoragarh, Uttarakhand
July 15, 2025

Prime Minister Shri Narendra Modi today condoled the loss of lives due to a road accident in Pithoragarh, Uttarakhand. He announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each deceased and Rs. 50,000 to the injured.

The PMO India handle in post on X said:

“Saddened by the loss of lives due to a road accident in Pithoragarh, Uttarakhand. Condolences to those who have lost their loved ones in the mishap. May the injured recover soon.

An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi”