पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित श्री गुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्यात भाग घेतला.पंतप्रधानांनी श्री गुरु तेग बहादूरजींना प्रार्थना केली.400 रागी यांनी शबद /कीर्तन केले त्यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान प्रार्थनेला बसले. यावेळी शीख नेतृत्वाकडून पंतप्रधानांचा गौरव करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते स्मृती नाणे आणि टपाल तिकीटाचेही प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, गुरुंच्या कृपेने ,आदरणीय गुरूंच्या शिकवणुकीनुसार देश संपूर्ण निष्ठेने पुढे वाटचाल करत आहे. पंतप्रधानांनी गुरुंच्या चरणी नतमस्तक झाले. गुरू तेग बहादूर जी यांच्या हौतात्म्याचे साक्षीदार असलेल्या आणि देशाच्या इतिहासाचे आणि आकांक्षांचे प्रतिबिंब असलेल्या लाल किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या पार्श्वभूमीवर या ऐतिहासिक ठिकाणी आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले.
शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून भारताची मुक्तता आणि भारताचे स्वातंत्र्य हे भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रवासापासून वेगळे करता येणार नाही.म्हणूनच, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि श्रीगुरू तेग बहादूरजींचे 400 वे प्रकाश पर्व एकाच संकल्पाने साजरे करत आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. “आपल्या गुरुंनी नेहमीच ज्ञान आणि अध्यात्मासोबत समाज आणि संस्कृतीची जबाबदारी घेतली.त्यांनी सामर्थ्य हे सेवेचे माध्यम बनवले,” ते पुढे म्हणाले.
“ही भारताची भूमी केवळ एक देश नाही तर आपला महान वारसा आणि महान परंपरा आहे.याचे जतन संवर्धन आपल्या ऋषीमुनींनी, गुरूंनी शेकडो हजारो वर्षांच्या तपस्येने आणि समृद्ध विचारांना केले आहे.” असे पंतप्रधान म्हणाले. गुरु तेग बहादूर जी यांच्या अमर बलिदानाचे प्रतीक असलेला लाल किल्याजवळचा गुरुद्वारा शीशगंज साहिब गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाच्या महानतेचे स्मरण करून देतो, असे मोदी म्हणाले. त्या काळात धर्माच्या नावाखाली हिंसाचार करणाऱ्यांची धार्मिक कट्टरता आणि टोकाच्या अत्याचारांची पंतप्रधानांनी यावेळी आठवण करून दिली.“त्यावेळी भारताला आपली ओळख वाचवण्याची मोठी आशा गुरु तेग बहादूरजींच्या रूपाने उभी राहिली.औरंगजेबाच्या जुलमी विचारसरणीसमोर गुरू तेग बहादूरजी खंबीरपणे 'हिंद दी चादर' म्हणून उभे राहिले.”, असे पंतप्रधान म्हणाले. गुरू तेग बहादूरजींच्या बलिदानाने भारतातील अनेक पिढ्यांना त्यांच्या संस्कृतीच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आणि तिच्या आदरासाठी आणि सन्मानासाठी जगण्याची आणि मरण्याची प्रेरणा दिली आहे.मोठ्या शक्ती नाहीशा झाल्या, मोठी वादळे शांत झाली, पण भारत अजूनही अमर आहे, पुढे जात आहे, असेही ते म्हणाले.आज पुन्हा एकदा जग भारताकडे आशेने आणि अपेक्षेने पाहत आहे, यावर मोदी यांनी भर दिला. “आम्हाला ‘नव्या भारता'च्या तेजोवलयामध्ये सर्वत्र गुरू तेग बहादूरजींचा आशीर्वाद जाणवतो ” असे पंतप्रधान म्हणाले.
देशाच्या कानाकोपऱ्यात असलेला गुरूंचा प्रभाव आणि त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, गुरु नानक देवजींनी संपूर्ण देशाला एका धाग्यात जोडले आहे .गुरु तेग बहादूर यांचे अनुयायी सर्वत्र होते . पाटणा येथील पवित्र पटना साहिब आणि दिल्लीतील रकाबगंज साहिबचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, “गुरूंचे ज्ञान आणि आशीर्वादाच्या रूपात आम्हाला सर्वत्र ‘एक भारत’ चे दर्शन होते. ” शीख वारसा उत्सव साजरे करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा दाखला देत , पंतप्रधानांनी नमूद केले की, गेल्या वर्षीच सरकारने साहिबजादांच्या महान बलिदानाच्या स्मरणार्थ 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.शीख परंपरेतील तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. करतार साहिबची प्रतीक्षा संपली आहे आणि अनेक सरकारी योजना या पवित्र स्थळांची यात्रा सुकर आणि सुलभ बनवत आहेत.स्वदेश दर्शन योजनेंतर्गत, आनंदपूर साहिब आणि अमृतसर साहिबसह अनेक प्रमुख ठिकाणांचा समावेश असलेले तीर्थक्षेत्र सर्किट तयार होत आहे. हेमकुंड साहिब येथे रोपवेचे काम सुरू आहे. गुरु ग्रंथसाहिबच्या महिमेला वंदन करत मोदी म्हणाले की, श्री गुरु ग्रंथ साहिब जी, आपल्यासाठी, आत्म-जाणिवेचे मार्गदर्शक तसेच भारताच्या विविधतेचे आणि एकतेचे जिवंत स्वरूप आहेत.त्यामुळेच अफगाणिस्तानात संकट आले तेव्हा आपल्या पवित्र गुरु ग्रंथसाहिबच्या आवृत्त्या परत आणण्याचा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा भारत सरकारने पूर्ण ताकद लावली आणि पूर्ण सन्मानाने त्या परत आणल्या. नागरिकत्व सुधारणा कायद्याने शेजारील देशांतून येणाऱ्या शीख आणि अल्पसंख्याकांसाठी नागरिकत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही ते म्हणाले.
भारताच्या तत्त्वज्ञानाच्या गाभ्याबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, “भारताने कधीही कोणत्याही देशाला किंवा समाजाला धोका निर्माण केलेला नाही. आजही आपण संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करतो. जेव्हा आपण आत्मनिर्भर भारताबद्दल बोलतो तेव्हा आपण संपूर्ण जगाच्या प्रगतीचा विचार करतो.
आजचा भारत जागतिक संघर्षाच्या काळातही संपूर्णासह स्थैर्यासह शांततेसाठी प्रयत्न करत आहे आणि भारत देशाच्या संरक्षण आणि सुरक्षेसाठीही तितकाच खंबीर आहे. आपल्यासमोर गुरुंनी दिलेली महान शीख परंपरा आहे, असेही ते म्हणाले.
गुरुंनी जुने रूढीवादी विचार बाजूला ठेवून नवीन कल्पना मांडल्या.त्यांच्या शिष्यांनी त्या अवलंबल्या आणि त्यातून ते शिकले. नव विचाराची ही सामाजिक मोहीम म्हणजे वैचारिक पातळीवरचा नवोन्मेष होता. “नवीन विचार, सतत कठोर परिश्रम आणि 100% समर्पण, ही आजही आपल्या शीख समाजाची ओळख आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळात आज देशाचा हा संकल्प आहे.आपल्या अस्मितेचा अभिमान असायला हवा. आपल्याला स्थानिकांचा अभिमान असायला हवा, आपल्याला आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
अभी शबद कीर्तन सुनकर जो शांति मिली, वो शब्दों में अभिव्यक्त करना मुश्किल है।
— PMO India (@PMOIndia) April 21, 2022
आज मुझे गुरू को समर्पित स्मारक डाक टिकट और सिक्के के विमोचन का भी सौभाग्य मिला है।
मैं इसे हमारे गुरूओं की विशेष कृपा मानता हूं: PM @narendramodi
मुझे खुशी है आज हमारा देश पूरी निष्ठा के साथ हमारे गुरुओं के आदर्शों पर आगे बढ़ रहा है।
— PMO India (@PMOIndia) April 21, 2022
इस पुण्य अवसर पर सभी दस गुरुओं के चरणों में नमन करता हूँ।
आप सभी को, सभी देशवासियों को और पूरी दुनिया में गुरुवाणी में आस्था रखने वाले सभी लोगों को प्रकाश पर्व की हार्दिक बधाई देता हूँ: PM
ये लालकिला कितने ही अहम कालखण्डों का साक्षी रहा है।
— PMO India (@PMOIndia) April 21, 2022
इस किले ने गुरु तेग बहादुर जी की शहादत को भी देखा है और देश के लिए मरने-मिटने वाले लोगों के हौसले को भी परखा है: PM @narendramodi
ये भारतभूमि, सिर्फ एक देश ही नहीं है बल्कि हमारी महान विरासत है, महान परंपरा है।
— PMO India (@PMOIndia) April 21, 2022
इसे हमारे ऋषियों, मुनियों, गुरुओं ने सैकड़ों-हजारों सालों की तपस्या से सींचा है, उसके विचारों को समृद्ध किया है: PM @narendramodi
ये भारतभूमि, सिर्फ एक देश ही नहीं है बल्कि हमारी महान विरासत है, महान परंपरा है।
— PMO India (@PMOIndia) April 21, 2022
इसे हमारे ऋषियों, मुनियों, गुरुओं ने सैकड़ों-हजारों सालों की तपस्या से सींचा है, उसके विचारों को समृद्ध किया है: PM @narendramodi
उस समय देश में मजहबी कट्टरता की आँधी आई थी।
— PMO India (@PMOIndia) April 21, 2022
धर्म को दर्शन, विज्ञान और आत्मशोध का विषय मानने वाले हमारे हिंदुस्तान के सामने ऐसे लोग थे जिन्होंने धर्म के नाम पर हिंसा और अत्याचार की पराकाष्ठा कर दी थी: PM @narendramodi
यहाँ लालकिले के पास में ही गुरु तेगबहादुर जी के अमर बलिदान का प्रतीक गुरुद्वारा शीशगंज साहिब भी है!
— PMO India (@PMOIndia) April 21, 2022
ये पवित्र गुरुद्वारा हमें याद दिलाता है कि हमारी महान संस्कृति की रक्षा के लिए गुरु तेगबहादुर जी का बलिदान कितना बड़ा था: PM @narendramodi
गुरु तेग बहादुर जी के बलिदान ने, भारत की अनेकों पीढ़ियों को अपनी संस्कृति की मर्यादा की रक्षा के लिए, उसके मान-सम्मान के लिए जीने और मर-मिट जाने की प्रेरणा दी है।
— PMO India (@PMOIndia) April 21, 2022
बड़ी-बड़ी सत्ताएँ मिट गईं, बड़े-बड़े तूफान शांत हो गए, लेकिन भारत आज भी अमर खड़ा है, आगे बढ़ रहा है: PM
गुरु नानकदेव जी ने पूरे देश को एक सूत्र में पिरोया।
— PMO India (@PMOIndia) April 21, 2022
गुरु तेगबहादुर जी के अनुयायी हर तरफ हुये।
पटना में पटना साहिब और दिल्ली में रकाबगंज साहिब, हमें हर जगह गुरुओं के ज्ञान और आशीर्वाद के रूप में ‘एक भारत’ के दर्शन होते हैं: PM @narendramodi
पिछले वर्ष ही हमारी सरकार ने, साहिबजादों के महान बलिदान की स्मृति में 26 दिसंबर को वीर बाल दिवस मनाने का निर्णय लिया।
— PMO India (@PMOIndia) April 21, 2022
सिख परंपरा के तीर्थों को जोड़ने के लिए भी हमारी सरकार निरंतर प्रयास कर रही है: PM @narendramodi
श्री गुरुग्रंथ साहिब जी हमारे लिए आत्मकल्याण के पथप्रदर्शक के साथ साथ भारत की विविधता और एकता का जीवंत स्वरूप भी हैं।
— PMO India (@PMOIndia) April 21, 2022
इसलिए, जब अफ़ग़ानिस्तान में संकट पैदा होता है, हमारे पवित्र गुरुग्रंथ साहिब के स्वरूपों को लाने का प्रश्न खड़ा होता है, तो भारत सरकार पूरी ताकत लगा देती है: PM
भारत ने कभी किसी देश या समाज के लिए खतरा नहीं पैदा किया।
— PMO India (@PMOIndia) April 21, 2022
आज भी हम पूरे विश्व के कल्याण के लिए सोचते हैं।
हम आत्मनिर्भर भारत की बात करते हैं, तो उसमें पूरे विश्व की प्रगति लक्ष्य का सामने रखते हैं: PM @narendramodi
नई सोच, सतत परिश्रम और शत प्रतिशत समर्पण, ये आज भी हमारे सिख समाज की पहचान है।
— PMO India (@PMOIndia) April 21, 2022
आजादी के अमृत महोत्सव में आज देश का भी यही संकल्प है।
हमें अपनी पहचान पर गर्व करना है।
हमें लोकल पर गर्व करना है, आत्मनिर्भर भारत का निर्माण करना है: PM @narendramodi