तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापरामुळे स्वच्छता आणि जागेची अधिक उपलब्धता या फायद्यांची पंतप्रधानांनी घेतली दखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे स्वच्छता आणि जागेची अधिक उपलब्धता या फायद्यांची दखल घेतली आहे.
केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री, किरेन रिजिजू यांनी एका ट्विटमध्ये मंत्रालयातील दस्तावेजांच्या डिजिटायझेशनमुळे स्वच्छता आणि अधिक जागा उपलब्ध झाल्याविषयी माहिती दिली.
केंद्रीय कायदा व न्यायमंत्र्यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले;
“अद्भुत! तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराच्या परिणामस्वरूप स्वच्छता आणि अधिक जागा उपलब्ध होते.”
Wonderful! Such efforts have the advantages of increased usage of technology, cleanliness and better usage of space. https://t.co/MNVqpOfOpi
— Narendra Modi (@narendramodi) May 9, 2023