पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील 13 वर्षीय मीनाक्षी क्षत्रियने नि-क्षय मित्र म्हणून स्वत:ची नावनोंदणी करून आणि तिच्या बचतीतून क्षयरूग्णांची काळजी घेऊन केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
"उल्लेखनीय भावना, जी क्षयरोगमुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नांना चालना देईल."
Noteworthy gesture, which will boost the efforts towards achieving TB-free India. https://t.co/IAFh4k65Em
— Narendra Modi (@narendramodi) February 4, 2023