दोन आठवड्यांत दुसरे हृदय प्रत्यारोपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस’ (AICTS, पुणे) च्या डॉक्टरांचे कौतुक केले आहे.
भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले:
"कौतुकास्पद प्रयत्न. ही शस्त्रक्रिया करण्यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे मी कौतुक करतो.”
Commendable effort. I appreciate all those involved in this. https://t.co/QLEAaGpccS
— Narendra Modi (@narendramodi) February 15, 2023