पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 18 मुलांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान केले. यापैकी तीन पुरस्कार मरणोत्तर देण्यात आले आहेत.
पुरस्कार विजेत्यांबरोबर संवाद साधतांना पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या शौर्याच्या कथांबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली तसेच माध्यमांनीही त्या अधोरेखित केल्या म्हणूनच अन्य मुलांना यातून प्रेरणा मिळते आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण होते.
पुरस्कार विजेत्यांपैकी बहुतांश मुले ग्रामीण आणि विनम्र पार्श्वभूमीची आहेत. प्रतिकुल परिस्थितीशी धैर्याने सामोरे जाण्याचे सामर्थ्य त्यांना त्यांच्या दैनंदिन संघर्षातून मिळत असते, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि शालेय शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या शौर्याच्या माहितीची नोंद ठेवणाऱ्या आणि त्याकडे लक्ष वेधण्यात मदत करणाऱ्या सर्वांची त्यांनी प्रशंसा केली.
या पुरस्कारामुळे या विजेत्यांकडून भविष्यातील अपेक्षा अधिक वाढल्या आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यावेळी उपस्थित होत्या.