पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात आयआयएसईआर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत वैज्ञानिकांशी संवाद साधला. स्वच्छ ऊर्जेसाठी नवे साहित्य आणि उपकरणे, कृषी जैवतंत्रज्ञान, नैसर्गिक संसाधने मॅपिंग अशा विविध विषयांवर वैज्ञानिकांनी यावेळी सादरीकरण केले. आण्विक जैवतंत्रज्ञान, हवामानविषयक अभ्यास, गणिती वित्त संशोधन या क्षेत्रातले अद्ययावत तंत्रज्ञान या सादरीकरणादरम्यान दाखविण्यात आले.
या माहितीपर सादरीकरणाबद्दल पंतप्रधानांनी वैज्ञानिकांची प्रशंसा केली. देशाचा जलदगती विकास साधण्यासाठी उपयुक्त आणि देशाच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करणारे माफक दरातले तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याआधी, पंतप्रधानांनी या संस्थेच्या पुणे परिसराला भेट देऊन विद्यार्थी आणि संशोधकांशी संवाद साधला. या संस्थेत सी-डॅकने आणलेल्या परम ब्रम्ह या सुपर कॉम्युटरची पाहणी केली.
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था ही देशातल्या विज्ञान शिक्षण आणि संशोधन विषयक संस्थांपैकी एक अव्वल समूह आहे.
पोलीस महासंचालकाच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान दोन दिवसांच्या पुणे भेटीवर आहेत.