पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार सरोवर धरणावरील आकर्षक विद्युत रोषणाईचे उद्घाटन केले. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व अधिकृत भाषांमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या संकेतस्थळाचे अनावरण केले आणि युनिटी ग्लो गार्डनमध्ये केवडिया अॅपचा शुभारंभ केला. त्यांनी कॅक्टस उद्यानाचे उद्घाटन करुन उद्यानाचे निरीक्षण केले.
सरदार सरोवर धरणावरील आकर्षक विद्युतरोषणाई
युनिटी ग्लो गार्डन
3.61 एकर क्षेत्रावर विस्तारलेले हे एक अद्वितीय थीम पार्क आहे. यात आकर्षक लकाकणारी फुले, आकृत्या आणि नेत्रदीपक (ऑप्टीकल इल्युजन्स) कलाकृती आहेत. पंतप्रधानांनी पर्यटकांना रात्र पर्यटनाचा आनंद घेण्याचे आवाहन केले.
कॅक्टस गार्डन
हे एक भव्य वास्तुकलात्मक हरितगृह आहे, ज्यामध्ये 17 देशांमधील 450 प्रकारच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वनस्पतींच्या प्रजाती आहेत. यात 6 लाख रोपटी आहेत, त्यापैकी 1.9 लाख कॅक्टस रोपटी 25 एकरावर विस्तारली आहेत.