पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियाचे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारलेल्या डॉ. महाथिर मोहम्मद यांचे दूरध्वनी द्वारे अभिनंदन केले. मलेशियाच्या मैत्रीपूर्ण जनतेच्या प्रगती आणि समृद्धीसाठी पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.
परस्परांना हितकारक भारत-मलेशिया संबंध सामाईक मूल्ये, हित आणि उभय देशांच्या जनतेमधील थेट संबंधांच्या मजबूत पायावर आधारीत आहेत, असे ते म्हणाले. भारत-मलेशिया धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.