फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ यांनी ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ या फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला.
या पुरस्काराबद्दल पंतप्रधानांनी भारतीय जनतेच्या वतीने फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्राँ यांचे आभार मानले. पॅरिसमधील एलिसी पॅलेस येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.